How To Book Train Ticket : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की अनेक जण गावाला किंवा नातेवाईकांकडे जाण्याचा प्लॅन करतात. इतकंच नाही तर काही कामानिमित्तानेही बाहेरगावी जावं लागतं. वेळेवर जावं लागतं. पण रेल्वेचं तिकीट कन्फर्म मिळत नाही. अशावेळी ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळवणं मोठं आव्हान ठरतं. मग एजन्टला तिप्पट पैसे देऊन तिकीट मिळवावं लागतं. मात्र, भारतीय रेल्वेच्या ‘तात्काळ’ सुविधेचा वापर करून तुम्ही प्रवासाच्या आदल्या दिवशीही तिकीट बुक करू शकता. यासाठी आपल्याला एजन्टकडे जाण्याची गरज पडणार नाही. फक्त काही छोट्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}तात्काळ तिकीट बुकिंगची वेळ
- AC क्लास (3AC, 2AC, First Class) साठी बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते.
- Sleeper क्लाससाठी बुकिंग सकाळी 11 वाजता सुरू होते.
- रेल्वेकडून काही सीट्स खास तात्काळ कोट्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.
तात्काळ तिकीट कसं बुक करायचं?
- सर्वप्रथम IRCTC Official Website वर जा.
- आपल्या अकाउंटमध्ये लॉगिन करा.
- “Book Ticket” या पर्यायावर क्लिक करा.
- “From” मध्ये प्रवास सुरू होणारे स्टेशन आणि “To” मध्ये गंतव्य स्टेशन टाका.
- तिकीट प्रकारात “Tatkal” हा पर्याय निवडा.
- प्रवासाची तारीख निवडून “Search” वर क्लिक करा.
- उपलब्ध ट्रेनची यादी दिसेल. त्यातील योग्य ट्रेन आणि क्लास निवडा.
- “Book Now” वर क्लिक करून प्रवाशांची माहिती भरा.
- कॅप्चा आणि मोबाईल नंबर टाकून पेमेंट पूर्ण करा.
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल.
कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी टिप्स
- IRCTC वर आधीच लॉगिन करून ठेवा.
- प्रवाशांची माहिती “Master List” मध्ये सेव्ह करून ठेवा.
- बुकिंग सुरू होताच लगेच प्रक्रिया पूर्ण करा
- इंटरनेट स्पीड चांगला असणे महत्त्वाचे आहे.
योग्य वेळ आणि थोडी तयारी ठेवली तर तत्कालमध्येही कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते.
English
हिंदी सारांश
Web Title : Get confirmed train ticket during vacation: Easy Tatkal booking guide.
Web Summary : Book Tatkal tickets easily for vacation travel! Use IRCTC, book AC tickets at 10 AM, Sleeper at 11 AM. Save passenger details, ensure fast internet for confirmed tickets.
Web Summary : Book Tatkal tickets easily for vacation travel! Use IRCTC, book AC tickets at 10 AM, Sleeper at 11 AM. Save passenger details, ensure fast internet for confirmed tickets.
Web Title : छुट्टियों में चाहिए कन्फर्म टिकट? तत्काल बुकिंग का आसान तरीका जानें।
Web Summary : छुट्टियों में यात्रा के लिए तत्काल टिकट आसानी से बुक करें! IRCTC का उपयोग करें, एसी टिकट सुबह 10 बजे और स्लीपर 11 बजे बुक करें। यात्री विवरण सहेजें, कन्फर्म टिकट के लिए तेज़ इंटरनेट सुनिश्चित करें।