अमेरिकेत नर्सना वर्षाला किती पगार मिळतो? पगाराचा आकडा वाचून लगेच शिफ्ट होण्याचा कराल प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 16:47 IST2026-05-09T16:46:42+5:302026-05-09T16:47:54+5:30
Interesting Facts : भारतात अनेक तरूणी नर्सिंगमध्ये करिअर करतात, पण पगार बराच कमी असतो. पण अमेरिकेत नर्सेसना भरमसाठ पगार मिळतो. तो किती असतो ते पाहुयात.

अमेरिकेत नर्सना वर्षाला किती पगार मिळतो? पगाराचा आकडा वाचून लगेच शिफ्ट होण्याचा कराल प्लॅन
Interesting Facts : भारतात नर्सिंगकडे तरूण आणि तरूणींचा कल मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. कारण या क्षेत्रात सन्मान तर मिळतोच, सोबतच सेवेचे प्रोफेशनही आहे. पण भारतात या प्रोफेशनमध्ये पगार तुलनेने कमीच मिळतो. दुसरीकडे अमेरिकेत नर्सेसची मोठ्या प्रमाणावर मागणी असून त्यांना मिळणारा पगार इतका जास्त आहे की अनेक भारतीय नर्सेस आता अमेरिकेत करिअर करण्याचा विचार करत आहेत.
अलीकडेच एका भारतीय नर्सने सोशल मीडियावर अमेरिकेतील आपल्या पगाराबद्दल माहिती दिल्यानंतर याची मोठी चर्चा सुरू झाली. अमेरिकेत रजिस्टर्ड नर्स (RN) ची सरासरी वार्षिक कमाई साधारण ९८,००० ते १,००,००० डॉलर इतकी असल्याचं सांगितलं जातं. भारतीय करन्सीनुसार ही कमाई अंदाजे ८२ ते ८५ लाख रुपयांच्या घरात जाते. काही राज्यांमध्ये म्हणजे खासकरून California मध्ये नर्सेसची कमाई १ कोटी रुपयांपेक्षाही जास्त असू शकते.
भारताच्या तुलनेत मोठा फरक
अमेरिकेत काम करणाऱ्या अनेक भारतीय नर्सेसच्या मते, जेवढा जास्त अनुभव असेल त्यांचं वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षाही जास्त होऊ शकतं. अमेरिकेत नर्सचे काम केवळ रुग्णांची सेवा करण्यापुरते मर्यादित नसून त्यांना चांगला पगार, हेल्थ इन्शुरन्स, रिटायरमेंट प्लॅन, पेड लीव्ह आणि करिअर ग्रोथच्या भरपूर संधी मिळतात. भारतात अनेक नर्सेसना दर महिन्याला अंदाजे १५ ते २५ हजार रुपये पगार मिळतो, तर अमेरिकेत सुरुवातीचा पगारच ४ ते ५ लाख रुपये प्रतिमहिना असू शकतो.
अमेरिकेत नर्सेसची कमतरता?
अमेरिकेत वृद्धांची वाढती लोकसंख्या, निवृत्त होणारे नर्सिंग कर्मचारी आणि वेगाने वाढणारे हेल्थकेअर क्षेत्र ही नर्सेसच्या कमतरतेची मुख्य कारणे मानली जातात. BLS (Bureau of Labor Statistics) च्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत अमेरिकेला लाखो नर्सेसची गरज भासणार आहे. त्यामुळे भारत, फिलिपाइन्स आणि इतर देशांतील नर्सेसना प्राधान्य दिले जात आहे.
अमेरिकेत जाण्याची प्रक्रिया
भारतीय नर्सेससाठी अमेरिकेत जाण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी मानली जाते. त्यासाठी NCLEX-RN ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त्यानंतर व्हिसा प्रक्रिया सुरू होते. EB-3 व्हिसा कॅटेगरीअंतर्गत नर्सेसना ग्रीन कार्ड मिळण्याची संधी चांगली असते. अनेक अमेरिकन हॉस्पिटल्स भारतीय नर्सेसना स्पॉन्सरशिपही देतात.
चांगले वर्किंग एन्व्हायरमेंट
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित नर्सने अमेरिकेतील कामाचे वातावरण अधिक व्यावसायिक असल्याचे सांगितले. पुरेसे स्टाफ असल्याने कामाचा ताण नियंत्रित राहतो. आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा नियम आणि कामाबद्दल आदर मिळत असल्याने कामाचा अनुभव चांगला असल्याचे ती म्हणाली. याउलट भारतात कमी स्टाफ, जास्त कामाचा ताण आणि कमी पगाराबद्दल तक्रारी कायम असतात.
भारतीय नर्सेसची वाढती स्थलांतराची लाट
केरळ, पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्रातील अनेक नर्सेस आधीच अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. त्या केवळ चांगली कमाईच करत नाहीत, तर आपल्या कुटुंबियांनाही तिथे बोलावत आहेत.