Petrol Price In 1947 : अमेरिका, इस्त्राइल आणि इराण यांच्यातील तणावामुळे अनेक देशांमध्ये तेलाचा मोठा तुटवडा जाणवायला लागला. याचा परिणाम असा झाला की, अनेक देशांमध्ये पेट्रोल - डिझेलच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली. काही दिवसांआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला आणि लगेच काही दिवसातच पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत ३ रूपयांनी वाढ झाली. पेट्रोल - डिझेलच्या या वाढत्या किंमतीची चर्चा सगळीकडे सुरू आहे. अशात अनेकांना कुतूहल म्हणून असाही प्रश्न पडतोय की, देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पेट्रोलची किंमत किती होती किंवा त्यानंतरच्या काही वर्षात किती होती? तेच आपण पाहणार आहोत.
ज्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे १९४७ साली देशात पेट्रोल केवळ २७ पैशांमध्ये एक लीटर पेट्रोल मिळत होतं. म्हणजे या हिशोबाने पाहिलं तर १ रूपयांमध्ये साधारण ३.७ लीटर पेट्रोल मिळत होतं. त्यावेळी सरासरी एका कारची टाकी ही ४० लीटरची राहत होती. जी फुल करण्यासाठी केवळ १० ते ११ रूपये लागत होते. तेच जर आज टाकी फुल करायची म्हटली तर ४ हजार रूपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील.
१९४७ पासून पेट्रोलच्या किंमतीचा प्रवास
१९४७ - २७ पैसे प्रति लीटर
१९७० - १ रूपया प्रति लीटर
१९९० - १२.२३ रूपये प्रति लीटर
२००२ - २६ ते ३० रूपये प्रति लीटर
२०१४ - ६६ ते ८३ रूपये प्रति लीटर
२०२६ - १०० रूपयांपेक्षा प्रति लीटर (शहरांनुसार वेगवेगळे)
ही आकडेवारी जर पाहिली तर १९४७ ते १९७० या काळात पेट्रोलची किंमत स्थिर होती. पण १९७० नंतर तेल संकटाने जगभरातील पेट्रोलच्या किंमती वाढल्या. आज पेट्रोलची किंमत आकाशाला भिडली आहे.
भारतात पहिलं पेट्रोल पंप कधी सुरू झालं?
भारतात पहिलं पेट्रोल पंप हे १९२८ मध्ये मुंबईत सुरू झालं होतं. हे पंप बर्मा शेल कंपनीद्वारे ह्यूजेस रोज म्हणजे आत्ताच्या एनी बेझेंट रोडवर उघडण्यात आलं होतं. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, त्यावेळी पेट्रोलची किंमत ६ पैसे ते १२ पैसे प्रति लीटर दरम्यान होती.
Web Summary : In 1947, petrol cost just 27 paise per liter in India. A full tank (40 liters) was around ₹10-11. Prices rose significantly over the decades, reaching over ₹100 per liter recently. The first petrol pump opened in Mumbai in 1928.
Web Summary : 1947 में, भारत में पेट्रोल की कीमत सिर्फ 27 पैसे प्रति लीटर थी। एक फुल टैंक (40 लीटर) लगभग ₹10-11 का था। दशकों में कीमतें काफी बढ़ गईं, जो हाल ही में ₹100 प्रति लीटर से अधिक हो गईं। पहला पेट्रोल पंप 1928 में मुंबई में खुला।