Jarahatke : देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उन्हाचा पारा ४५ डिग्रीच्या वर जाऊन पोहोचलाय. लोकांचं घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय. दिवसरात्र लोक एसी-कुलरसमोर बसून राहताहेत. त्यामुळे जसजसा उन्हाचा पारा वाढतोय, तसा इलेक्ट्रिल बिलाचा देखील वाढतोय. अशात 'पिंक सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपुरमधील तब्बल ४ हजारांपेक्षा जास्त कुटुंबांनी या गरमीवर एक जालीम उपाय शोधला आहे. उन्हाळ्यात घराचं छत सगळ्यात जास्त गरम होतं. सूर्याची प्रखर किरणं थेट छतावर पडतात आणि छत तापलं की घरातही उकडायला होतं. पण जयपुरच्या लोकांनी यावर एक जबरदस्त उपाय शोधलाय. ज्यामुळे छत गरम होणं बंद झालंय. जयपुरमधील अनेक कुटुंबांनी घराच्या छतांवर छोटे-छोटे गार्डन बनवले. रिकाम्या छतावर आता झाडं, भाज्यांची रोपं आणि हिरवळ दिसू लागलीये. यातून त्यांना दोन फायदे झालेत, एक म्हणजे ऊन थेट छतावर पडत नाही, दुसरा म्हणजे झाडांमुळे हवेत थंडावा राहतो. ज्यामुळे आजूबाजूचं तापमान कमी होतं.
या सिस्टीममध्ये हलक्या वजनांचे खास बॉक्स किंवा बेड तयार केले जातात. ज्यात माती किंवा मातीशिवायही झाडं लावण्यात आली आहे. झाडं सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि त्यामुळे खाली घरात जास्त गरम होत नाही. सोबतच झाडांच्या थंडाव्याने हवाही थंड राहते. ET च्या रिपोर्टनुसार, जयपुरच्या ४ हजारांपेक्षा जास्त कुटुंबांनी हा उपाय केलाय. या घरात लोकांना जाणवलं की, विना एसी सुद्धा खोली अधिक थंड होत आहे. सोबतच विजेचं बिलही कमी झालं आणि लोकांचा नॅचरल पद्धतीने उन्हापासून लोकांचा बचाव होत आहे.
ही आयडिया समोर येण्यामागे एक व्यक्ती आहे, ज्याने कॉर्पोरेट नोकरी सोडून हे काम सुरू केलं. या व्यक्तीने लोकांना समजावलं की, रिकामं असलेलं छत एक कूलिंग सिस्टीम बनू शकतं. हळूहळू लोक यात जुळत गेले आणि याने उपायाने एक अभियानाचं रूप घेतलं. या उपायाचा व्हिडीओ समोर येताच व्हायरल झाला. अनेकांनी याला स्वस्त आणि शानदार उपाय मानलं.
पण दुसरीकडे एक्सपर्टचं मत आहे की, हा उपाय सगळीकडेच काम करेल असं नाही. खासकरून ज्या घरांचे छत कमजोर असतात आणि जागा कमी असते तिथे हा उपाय प्रभावी ठरू शकणार नाही. पण जिथे शक्य आहे तिथे उन्हापासून बचावासाठी हा उपाय चांगला पर्याय ठरू शकतो.
Web Summary : Jaipur residents combat extreme heat by creating rooftop gardens. This natural cooling system reduces indoor temperatures, lowers electricity bills, and promotes environmental benefits. Over 4,000 families are participating in this initiative, proving effective where structurally feasible.
Web Summary : जयपुर के निवासियों ने रूफटॉप गार्डन बनाकर गर्मी को मात दी। यह प्राकृतिक शीतलन प्रणाली घरों के अंदर तापमान कम करती है, बिजली बिल घटाती है, और पर्यावरण को लाभ पहुंचाती है। 4,000 से अधिक परिवार इसमें भाग ले रहे हैं।