लय भारी! कोरोनाकाळात २०० मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकानं 'असं' लावलं डोकं, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 15:10 IST2020-10-06T15:09:39+5:302020-10-06T15:10:10+5:30
Viral Video Marathi : ऑनलाईन शिक्षणासाठी डिजिटल साधनांचा वापर करणं सगळ्याच विद्यार्थांना शक्य होत नाही. काही विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन नाही. अशा स्थितीत हा उपक्रम कौतुकास्पद मानला जात आहे.

लय भारी! कोरोनाकाळात २०० मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकानं 'असं' लावलं डोकं, पाहा फोटो
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी झारखंडच्या एका शाळेतील दृश्य शेअर करत सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. शिक्षकाने कोरोना व्हायरसच्या माहामारीत सोशल डिस्टेंसिंग ठेवत २०० मुलांना शिकवण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार झारखंडच्या दुमका येथील डुमथर गावातील सरकारी शाळेतील शिक्षकाने भीतींवर फळ्याच्या आकारात काळा रंग लावला आहे. जेणेकरून मुलं स्मार्टफोनशिवाय शिक्षण घेऊ शकतील.
शिक्षकांचा आवाज लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचतो आणि मुलं फळ्यावर लिहीतात. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता. मुलांनी सोशल डिस्टेंसिंग ठेवलं आहे. फळ्यांची रचना त्याच पद्धतीने केली आहे. कोरोनाकाळात या शाळेच्या बदललेल्या रुपाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक मुलगा आरामात अभ्यास करू शकतो. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुले सर्वत्र शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन क्लास सुरू आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी डिजिटल साधनांचा वापर करणं सगळ्याच विद्यार्थांना शक्य होत नाही. काही विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन नाही. अशा स्थितीत हा उपक्रम कौतुकास्पद मानला जात आहे. Video : ऐन गर्दीच्या वेळी अचानक सुपर मार्केटचं सिलिंग कोसळलं; अन्....पाहा थरारक व्हिडीओ
In a village in Jharkhand, blackboards have been placed with social distancing where students write their lessons and the teacher uses a loudspeaker to teach them. 200 students are taught in this special class.
— Harsh Goenka (@hvgoenka) October 5, 2020
Amazing initiative in our incredible India! pic.twitter.com/OJH4JPRMkd
हर्ष गोयंका यांनी हा फोटो शेअर करत 'जिथे मुलं अभ्यास करतात' असं कॅप्शन दिलं आहे. त्यांनी सांगितले की, झारखंडच्या एका गावाता सोशल डिस्टेंसिंगचा विचार करून मुलांसाठी फळे रंगवण्यात आले आहेत. शिक्षक लाऊड स्पीकरच्या साहाय्याने धडा शिकवत आहेत. या स्पेशल वर्गात २०० मुलं अभ्यास करत असून अतुल्य भारतात अद्भूत पाऊल असंही त्यांनी म्हटलं आहे. दीड हजार वर्ष जुन्या पेटीत बंद होती ममी; अन् उघडल्यावर दिसलं 'असं' काही, पाहा व्हिडीओ