Video : ऐन गर्दीच्या वेळी अचानक सुपर मार्केटचं सिलिंग कोसळलं; अन्....पाहा थरारक व्हिडीओ

By manali.bagul | Published: October 5, 2020 02:09 PM2020-10-05T14:09:07+5:302020-10-05T14:12:36+5:30

Viral video of supermarket : एका सुपर मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी लोकांची गर्दी झालेली असताना अचानक सिलिंग कोसळण्याची घटना घडली. यामुळे उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे.

Viral News Marathi : Supermarket shelf collapse brazilian video viral on social media | Video : ऐन गर्दीच्या वेळी अचानक सुपर मार्केटचं सिलिंग कोसळलं; अन्....पाहा थरारक व्हिडीओ

Video : ऐन गर्दीच्या वेळी अचानक सुपर मार्केटचं सिलिंग कोसळलं; अन्....पाहा थरारक व्हिडीओ

Next

अनेकदा आपण सामान खरेदी करण्यासाठी बाजारात किंवा सुपरमार्केटमध्ये जातो तेव्हा आपल्याप्रमाणेच अनेक लोक आलेले असतात. अशा गर्दीच्या ठिकाणी एखादी लहानशी घटना घडली तरी ती खूप मोठी होते. कारण लोकांमध्ये अनेकदा भीतीचं वातावरण तयार होतं. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली. एका सुपर मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी लोकांची गर्दी झालेली असताना अचानक सिलिंग कोसळण्याची घटना घडली. यामुळे उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अचानक घडलेल्या या घटनेत जवळपास ८ लोक गंभीर जखमी झाल्याचे समोर आलं असून एकाला मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. हा व्हिडीओ ब्राझिलमधल्या सुपरमार्केटमधील असल्याचं समोर येत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे. 
 भारीच! लग्नानंतर पहिल्यांदाच ५८ वर्षांनी केलं फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल १ नंबर जोडी

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार या सुपरमार्केटमधील सिलिंग कसं कोसळलं. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. ही घटना ब्राझिलमधल्या साओ पाऊलो इथल्या मॅटियास अक्रेजो मिक्स सुपरमार्केटमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय या घटनेत मृत्यू झालेला तरूण २१ वर्षांचा असल्याचे सांगितले  जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केलं जात आहे. कारण सिलिंगखाली आल्यामुळे अनेक निष्पाप लोक जखमी झाले आहेत. यातील  ३ जणं हे  गंभीर स्थितीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणाची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत. अंतराळात झाला जबरदस्त ताऱ्याचा स्फोट, NASAनं शेअर केला अद्भूत VIDEO, पाहा दुर्मीळ दृश्य 

Web Title: Viral News Marathi : Supermarket shelf collapse brazilian video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.