अंतराळात झाला ताऱ्याचा जबरदस्त स्फोट, NASAनं शेअर केला अद्भूत VIDEO, पाहा दुर्मीळ दृश्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:26 PM2020-10-05T13:26:34+5:302020-10-05T14:57:58+5:30

Nasa shared video of star explosion 70 million light years from earth: एखाद्या ताऱ्याचा भीषण स्फोट झाल्यास त्याला पार्नोव्हा असं म्हणतात.

video of star explosion 70 million light years from earth shared by Nasa | अंतराळात झाला ताऱ्याचा जबरदस्त स्फोट, NASAनं शेअर केला अद्भूत VIDEO, पाहा दुर्मीळ दृश्य 

अंतराळात झाला ताऱ्याचा जबरदस्त स्फोट, NASAनं शेअर केला अद्भूत VIDEO, पाहा दुर्मीळ दृश्य 

Next

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एक अद्भूत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल  होत आहे. नासातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीपासून सुमारे 7 कोटी प्रकाश वर्ष लांब असलेल्या SN 2018gv सुपरनोव्हामध्ये हा स्फोट झाला होता. याआधी असा कोणताही व्हिडीओ पाहिला गेला नव्हता. एखाद्या ताऱ्याचा भीषण स्फोट झाल्यास त्याला पार्नोव्हा असं म्हणतात. आता सुपरनोव्हा NGC 2525 गॅलेक्सीमध्ये दिसली. तज्ज्ञांना असा विश्वास आहे की अशाच एका स्फोटानंतर पृथ्वीचा जन्म झाला होता.

नासाच्या म्हणण्यानुसार सुपरनोव्हा SN 2018gvचा शोध प्रथम जपानमधील हौशी खगोलशास्त्रज्ञ कोची इटागाकी यांनी 2018 मध्ये शोधला होता. इटागाकीने नासाला त्यांच्या शोधाबद्दल सांगितले होते. त्यानंतर अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने हब्बल दुर्बिणीच्या मदतीने या सुपरनोव्हाचे परीक्षण करण्यास सुरवात केली. सुपरनोव्हाचे परीक्षण करण्यासाठी नासाने स्लो-मोशन व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मोठा स्फोट झाला असून तार्‍यांमध्ये बदल झाला आहे.

अमेरिकेच्या अंतराळ एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट झाल्यानंतर सूर्यापेक्षा 5 अब्ज पट जास्त प्रकाश दिसून आला आहे. हे स्फोट प्रभावशाली असल्यामुळे आकाशगंगा आणि अनेक प्रकाशवर्ष वाढण्याची शक्यता आहे. यातून निघणारा प्रकाश इतका तीव्र, प्रखर आहे. यामुळे अर्धे ब्रह्माण्डसुद्धा पृथ्वीवरून दिसू शकते.

Web Title: video of star explosion 70 million light years from earth shared by Nasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.