शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

रहस्य : 'इथे' जमिनीतून दर सेकंदाला निघतं ३०० लीटर पाणी, वैज्ञानिकांनाही सापडला नाही सोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 12:21 IST

Fosse Dionne Spring in France : इथे हजारो वर्षापासून जमिनीतून रहस्यमयपणे दर सेकंदाला  ३०० लीटरपेक्षा जास्त पाणी सतत निघत राहतं. मात्र, आजपर्यंत वैज्ञानिकांना हे रहस्य उलगडता आलेलं नाही.

आपण आता २१व्या शतकात जगत आहोत आणि विज्ञानाने फार जास्त प्रगती केली  आहे. तरी सुद्धा जगात असे काही रहस्य आहेत जे चमत्कारापेक्षा कमी नाहीत. इतकंच काय तर हजारो वर्षांपासून अनेक रहस्यांवरून (Mysterious Spring in France) पडदाच उठलेला नाही. असंच एक रहस्य फ्रान्सच्या बरगंडी राज्यातील टोनेरे नावाच्या शहरात आहे. इथे हजारो वर्षापासून जमिनीतून रहस्यमयपणे दर सेकंदाला  ३०० लीटरपेक्षा जास्त पाणी सतत निघत राहतं. मात्र, आजपर्यंत वैज्ञानिकांना हे रहस्य उलगडता आलेलं नाही.

फ्रान्समध्ये जमिनीतून निघत असलेल्या या पाण्याला फॉसे डिओनी स्प्रिंग (Fosse Dionne Spring in France) असं नाव देण्यात आलं आहे. वैज्ञानिकांनी जमिनीतून सतत निघत असलेल्या या पाण्याच्या स्त्रोताबाबत जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण आजपर्यंत हे रहस्य त्यांना उलगडता आलेलं नाही. 

पावसाळ्यात ३ हजार लीटर पाणी निघतं

फॉसे डिओनी स्प्रिंगमधून प्रति सेकंदाला जमिनीतून ३०० लीटर पाणी निघतं. केवळ इतकंच नाही तर पावसाळ्यात इथे प्रति सेकंदाला ३ हजार लीटर पाणी निघतं. वैज्ञानिकांना हेही समजू शकलेलं नाही की, पावसाळ्यात अचानक इतकं जास्त

पाणी इथून निघतं कसं?

या ठिकाणाला लोक निसर्गाचा चमत्कार मानतात. असं सांगितलं जातं की रोमन लोक या झऱ्याचं पाणी पिण्यासाठीही वापरत होते. तेच १७व्या शतकात या झऱ्यावर लोक आंघोळ करत होते. १८व्या शतकात वैज्ञानिकांनी या झऱ्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.

जो आत गेला परत आलाच नाही

असं सांगितलं जातं की, फॉसे डिओनी स्प्रिंगचा जलस्त्रोत शोधण्यासाठी जे कुणी आत गेले ते कधीच परतले नाहीत. जे लोक आत गेले त्यांच्या मृत्यू झाला. तेव्हापासून लोक आत जाण्यास घाबरतात. १९७४ मध्ये एक व्यक्ती पाण्याचा स्त्रोत शोधण्यासाठी आत गेला होता, पण त्याचा मृत्यू झाला. नंतर १९९६ मध्ये अशाप्रकारे एकाचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Franceफ्रान्सInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके