Father shaved for the very first time twin kids reaction goes viral on social media | VIDEO : चिमुकल्यांनी पहिल्यांदाच पाहिलं वडिलांचं टक्कल, ओळखण्यास दिला नकार!

VIDEO : चिमुकल्यांनी पहिल्यांदाच पाहिलं वडिलांचं टक्कल, ओळखण्यास दिला नकार!

जरा आठवा की तुम्ही तुमच्या वडिलांना पहिल्यांदा टक्कल केलेलं किंवा मिशा काढलेलं पाहिलं तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? हा नवीन माणूस कोण असंच वाटलं असेल ना. असाच दोन चिमुकल्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यातील दोन्ही मुलींनी पहिल्यांदाच त्यांच्या वडिलांना टक्कल केलेलं पाहिलं. सुरूवातीला तर त्यांची प्रतिक्रिया नॉर्मल होती. पण नंतर दोघेही जोरात रडायला लागले. 

हा व्हिडीओ ट्विटर यूजर @Aqualady6666 ने शेअर केला आणि कॅप्शनला लिहिले की, जेव्हा या जुळ्या मुलांनी पहिल्यांदा त्यांच्या पप्पाला टक्कल केलेलं पाहिलं. जरा त्या दोघांची प्रतिक्रिया तर बघा.

व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, एक टक्कल केलेला व्यक्ती आहे. तो दोन मुलांसमोर बसला आहे. मुले त्याला बघतात. आधी ते शांत राहतात आणि काही वेळाने जोरात रडायला सुरूवात करतात. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला की, आतापर्यंत या व्हिडीओला १८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळत आहेत. तर ९३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहे.
 

Web Title: Father shaved for the very first time twin kids reaction goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.