काय सांगता! माकडाविरोधात दाखल करायची आहे एफआयआर, मृत व्यक्तीचे कुटुंबिय चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:18 IST2022-02-08T16:17:09+5:302022-02-08T16:18:55+5:30
याच महिन्याच्या ४ तारखेला माकडाने उडी मारल्याने जामताडाच्या बागडेहरी गावात एक भिंत पडली. याच्या मलब्याखाली दबून एक ३५ वर्षीय महिला कविता मंडलचा मृत्यू झाला.

काय सांगता! माकडाविरोधात दाखल करायची आहे एफआयआर, मृत व्यक्तीचे कुटुंबिय चिंतेत
(छायाचित्र - प्रातिनिधीक)
काही घटना अशा असतात ज्यात कितीही हात-पाय मारा, पण तुमच्या हाती निराशाच लागते. अशीच एक घटना झारखंडच्या जामताडामधून समोर आली आहे. एक भिंत एका माकडामुळे पडली आणि त्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेव्हा कुटुंबियांनी वन विभागाकडे नुकसान भरपाई मागितली तर त्यांनी एफआयआरची मागणी केली. पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले तर त्यांनी घटनेचा आरोपी आणि साक्षीदार आणण्यास सांगितले.
आता महिलेच्या मृत्यूनंतर परिवार त्या माकडाला कुठून शोधून आणणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची सूचना मिळाल्यावर वन विभागाचे अधिकारी तीन दिवसांनंतर पोहोचले, तोपर्यंत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पोस्टमार्टमही होऊ शकलं नाही.
माकडामुळे भींत पडून महिलेचा मृत्यू
मीडिया रिपोर्टनुसार, याच महिन्याच्या ४ तारखेला माकडाने उडी मारल्याने जामताडाच्या बागडेहरी गावात एक भिंत पडली. याच्या मलब्याखाली दबून एक ३५ वर्षीय महिला कविता मंडलचा मृत्यू झाला. याबाबत सूचना दिल्यावर विन विभाग तीन दिवसांनी घटनास्थळी पोहोचले.
मृत महिलेच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाईची मागणी केली तर वन विभागाने पोस्टमार्टम रिपोर्ट आणि एफआयआरची कॉपी दाखवण्यास सांगितलं. आता कुटुंबिय एफआयआर करणार तर कुणावर करणार? त्या माकडाला कुठून शोधून आणणार? ज्याच्या विरोधात रिपोर्ट दाखल करायचा आहे. महिलेचा पती आशीष मंडल या प्रकरणामुळे चिंतेत आहे आणि विचारात पडला आहे की, पत्नीच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाहीये.
एफआयआर दाखल करण्याबाबत पोलीस म्हणाले की, तीन दिवसआधी बॅक डेटवर कशी एफआयआर नोंदवून घेणार. इतकंच नाही तर माकडामुळे झालेल्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माकड कुठून आलं? कसं आलं? आणि घटनास्थळी कोण उपस्थित होतं? कुणी पाहिलं? इत्यादी प्रश्नांची उत्तरेही नव्हती. कुटुंबिय म्हणत आहे की, वन विभाग हे सगळं महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यावर तीन दिवसांनी सांगत आहे.