अजब रिवाज! पती जिवंत असतानाही दरवर्षी विधवा होतात येथील महिला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:44 PM2021-09-07T13:44:13+5:302021-09-07T13:45:30+5:30

एक समुदाय असाही आहे जिथे महिला पती जिवंत असताना दरवर्षी काही काळासाठी विधवांसारख्या राहतात. या समुदायाचं नाव आहे 'गछवाहा समुदाय'.

Every year women of gachwaha community are widows despite having husbands | अजब रिवाज! पती जिवंत असतानाही दरवर्षी विधवा होतात येथील महिला, कारण...

अजब रिवाज! पती जिवंत असतानाही दरवर्षी विधवा होतात येथील महिला, कारण...

Next

हिंदू धर्मात लग्नानंतर एका महिलेच्या जीवनात कुंकू, टिकली, मेहंदी या गोष्टींचं फार महत्व असतं. या सर्व वस्तू एका लग्न झालेल्या महिलेसाठी लग्नाचं प्रतीक मानल्या जातात. स्त्रीया पतीच्या आयुष्यासाठीच श्रृंगार करतात. उपवास ठेवतात. पण एक समुदाय असाही आहे जिथे महिला पती जिवंत असताना दरवर्षी काही काळासाठी विधवांसारख्या राहतात. या समुदायाचं नाव आहे 'गछवाहा समुदाय'.

या समुदायातील महिला पूर्वीपासून हा रिवाज पाळत आल्या आहेत. आजही हा रिवाज पाळला जातो. असं सांगितलं जातं की, येथील महिला आपल्या पतीच्या आयुष्यासाठी कामना करत दरवर्षी विधवांसारख्या राहतात. चला जाणून घेऊ यामागचं कारण... (हे पण वाचा : जेव्हा एका मुलीच्या प्रेमात १०० फटके खायलाही तयार होते महान राजा रणजीत सिंह)

गछवादा समाजातील मुख्यत्वे पूर्व उत्तर प्रदेशात राहतात. येथील पुरूष जवळपास पाच महिने ताडाच्या झाडांवरून ताडी उतरवण्याचं काम करतात. यादरम्यान ज्या महिलांचे पती झाडांवरून तााडी काढण्यासाठी जातात त्या महिला विधवांसारख्या राहतात. त्या ना कुंकू लावत, ना टिकली महिला कोणत्याही प्रकारचा श्रृंगार करत नाहीत. इतकंच नाही तर त्या या काळात उदास राहतात.

गछवाहा समुदायात तरकुलहा देवीला कुलदेवी म्हणून पूजलं जातं. ज्या काळात पुरूष ताडी उरतवण्याचं काम करतात. तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांचा सगळा श्रृंगार देवीच्या मंदिरात ठेवतात. ज्या झाडांवरून ताडी काढली जाते ती झाडं फार उंच असतात. जराशी चूक व्यक्तीच्या मृत्यूचं कारण ठरू शकते. त्यामुळे येथील महिला कुलदेवीकडे आपल्या पतीच्या सुरक्षित जीवनाची कामना करतात आणि आपला श्रृंगार मंदिरात ठेवतात.
 

Web Title: Every year women of gachwaha community are widows despite having husbands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.