English teacher groomed married former primary school student in UK | मै हू ना! शिक्षकाने विद्यार्थिनीला शाळेत शिकवले; वयात येताच पळून जात लग्न केले

मै हू ना! शिक्षकाने विद्यार्थिनीला शाळेत शिकवले; वयात येताच पळून जात लग्न केले

Teacher married former primary school student  : ब्रिटनच्या(UK) एका शिक्षकाने त्याच्यापेक्षा ३४ वर्षाने लहान विद्यार्थिनीसोबत लग्न केलंय. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीला शिक्षकाने प्रायमरी शाळेत शिकवलं होतं. ही घटना समोर आल्यावर शिक्षकाचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात आलं आहे. मुलगी आणि शिक्षकाच्या अफेअरबाबत( Teacher Student Affair) घरातील लोकांना अनेक वर्ष काहीच समजलं नाही.

डेल मेलच्या रिपोर्टनुसार, शिक्षकावर आरोप आहे की, मुलगी अल्पवयीन असताना तिला रिलेशनशिपसाठी तयार केलं आणि जेव्हा मुलगी १८ वर्षांची झाली तेव्हा तिच्यासोबत लग्न केलं. शिक्षकाने सांगितले की, काही वर्षाआधी त्याच्या पत्नीचा मृत्यू झालाय.

शिक्षकावर आरोप आहे की, विद्यार्थिनी जेव्हा ११ वर्षांची होती तेव्हापासून त्याने तिला रिलेशनशिपसाठी तयार केलं होतं. मुलीच्या घरातील लोकांना ७ वर्षे या रिलेशनशिपबाबत काहीच कळालं नव्हतं. जेव्हा एक दिवस घरी पोलीस आले, तेव्हा त्यांना मुलीच्या नात्याबाबत समजलं.

विद्यार्थिनीसोबत शिक्षकाच्या आक्षेपार्ह संबंधाबाबतची सुनावणी ब्रिटनच्या टीचर्स डिसिप्लीनरी ट्रिब्यूनलमध्ये करण्यात आली. सुनावणी दरम्यान असाही खुलासा झाला की, मुलीला एक्स्ट्रा लर्निंग सपोर्टची गरज होती. त्यामुळे क्लासनंतर ती शिक्षकासोबत थांबत होती. त्यामुळे तिच्या घरच्या लोकांना काही संशय आला नाही.

शिक्षक या मुलीला ज्वेलरी आणि पैसे देत होता. पण ब्रिटीश ट्रिब्यूनलने सुनावणी दरम्यान सांगितले की याचे ठोस असे काही पुरावे नाहीत की स्कूलिंग दरम्यान शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत कशाप्रकारचा गंभीर दुर्व्यवहार केला. मुलीच्या पालकांनी सांगितले की, त्यांना मुलीच्या या नात्याबाबत तेव्हा समजलं जेव्हा ती कॉलेजमध्ये होती आणि १८ वर्षाची झाली होती.
 

Web Title: English teacher groomed married former primary school student in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.