शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

चेंगिझखानच्या वारसांचे साम्राज्य सापडले

By admin | Published: October 27, 2014 1:38 AM

क्रूरकर्मा म्हणून इतिहासात नोंद असलेल्या चेंगिझखान याचे वारस जिथे राज्य करत होते, त्या ७५० वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष रशियातील व्होल्गा नदीच्या काठी सापडले आहेत.

मास्को : क्रूरकर्मा म्हणून इतिहासात नोंद असलेल्या चेंगिझखान याचे वारस जिथे राज्य करत होते, त्या ७५० वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष रशियातील व्होल्गा नदीच्या काठी सापडले आहेत. या परिसरातील उत्खननात दोन ख्रिश्चन धर्मस्थळे सापडली असून, त्यातील एका धर्मस्थळी सुरेख शिल्पे कोरलेली आढळली आहेत. या शहराचे नाव उकेक असून, १२२७ साली चेंगिझखानचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षात हे शहर स्थापन करण्यात आले आहे. चेंगिझखानचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या साम्राज्याचे तुकडे झाले. त्याचा नातू बातू खान सत्तेवर आला. त्याने १२०५ ते १२५५ या कालावधीत राज्य केले. हे साम्राज्य गोल्डन होर्ड या नावाने ओळखले जाते. पूर्व युरोप ते मध्य आशियापर्यंत पसरलेल्या या साम्राज्यात चीनला युरोपशी जोडणाऱ्या सिल्क रुटचेही अनेक मार्ग होते. उकेक शहर बातू खानच्या उन्हाळी निवासस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरात विस्तारित झाले होते. हे निवासस्थान व्होल्गा नदीवर होते.बातू खान सोन्याच्या तंबूत बसून राज्य करत असे, त्यामुळे त्याच्या साम्राज्याचे नाव गोल्डन होर्ड असे पडले. उकेक शहरात विविध जातीधर्माचे लोक राहत असत. पुरातत्ववेत्ते व सारातोव वस्तुसंग्रहालयाच्या लोकांनी उकेक शहराचा ख्रिश्चन भाग शोधून काढला आहे. बातू खानच्या साम्राज्यात ख्रिश्चन लोकांचे जीवन कसे होते, त्यावर या उत्खननानतून प्रकाश पडणे शक्य आहे. गोल्डन होर्ड साम्राज्यावर ख्रिश्चनांचे राज्य कधीच नव्हते; पण सर्वच ख्रिश्चन गुलामीचे जीवन जगत नव्हते. कारण त्यावेळी बनविल्या जाणाऱ्या मौल्यवान वस्तूही या उत्खननात आढळल्या आहेत. त्यात एक चिनी काचेची पिन असून, त्यावर डाळिंबाच्या दाण्यांचे डिझाईन आहे. उकेक शहर फार काळ टिकले नाही. १४ व्या शतकात गोल्डन होर्ड साम्राज्याचा विलय सुरू झाला. १३९५ साली उकेकवर हल्ला झाला. तामरलेन याने हे शहर तसेच गोल्डन होर्ड साम्राज्याचा बराच भाग जिंकून घेतला. यात उकेकची पडझड झाली. (वृत्तसंस्था)