शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी प्रवाशाचा दंगा आणि न झालेले विमान अपहरण

By admin | Updated: May 6, 2014 15:39 IST

इंडोनेशियातील बाली बेटावर जाणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या व्हजिर्न विमानात एका मद्यपी प्रवाशाने अपहरणाचा इशारा दिला व कॉकपीट फोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. हे विमान बाली बेटावर उतरविण्यात आले.

जकार्ता : इंडोनेशियातील बाली बेटावर जाणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या व्हजिर्न विमानात एका मद्यपी प्रवाशाने अपहरणाचा इशारा दिला व कॉकपीट फोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. हे विमान बाली बेटावर उतरविण्यात आले. यामुळे मद्यपी प्रवाशाचा दंगा अन हे विमान अपहरण नाट्य दिवसभर माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले.

ब्रिस्बेन ते बाली मार्गावर हे विमान जात असताना शुक्रवारी हा नाट्यमय प्रकार घडला. ७३७-८00 विमान बाली बेटावर उतरविण्यात आले, त्यावेळी विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. ब्रिस्बेन ते बाली विमानाचे अपहरण झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. पण व्हजिर्न ऑस्ट्रेलिया कंपनीने नंतर केलेल्या खुलाशानुसार मद्यपानाच्या नशेत असणार्‍या एका प्रवाशाने कॉकपीटच्या दाराला धडक दिल्यामुळे अपहरणाचा अलार्म वाजला. इंडोनेशियाच्या अधिकार्‍यांनी नंतर त्याला अटक केली. विमानाचे अपहरण झाले नाही, निरोप देण्यात गडबड झाली असे व्हजिर्न ऑस्ट्रेलियाचे बालीतील अधिकारी हेरू सुडजामिको यांनी सांगितले. अति मद्यपानामुळे, त्याची आक्रमकता वाढली होती, मला मिळालेल्या माहितीनुसार या प्रवाशाने कॉकपीटचे दार लावलेले असताना तसेच आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दाराला धडक बसली; पण त्याला आत जाता आले नाही. विमानातील कर्मचार्‍यांनी त्याला धरले व त्याचे हात बांधून त्याला मागच्या सीटवर बसवले. विमान बाली येथे उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याचवेळी गरुडा हवाई सेवेच्या विमानातून प्रवास करणारे पलानी मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या विमानाच्या वैमानिकाने बाली विमानतळ लॉक करण्यात आल्याचे सांगितले. बाली विमानतळावर अपहरण नाट्य सुरू असल्याने विमानाला कितीही उशीर होईल असेही जाहीर करण्यात आले होते. अपहरण नाट्य चाललेले विमान आमच्यापासून १५0 मीटर अंतरावर होते. तिथे लष्कराच्या गाड्या आलेल्या दिसत होत्या. व्हजिर्न विमानाला सुरक्षा रक्षकांचा वेढा घालण्यात आला, विमान बाजूला घेण्यात आले, त्यानंतर विमान वाहतूक सुरळीत करण्यात आली. (वृत्तसंस्था)