''Don''t complain about our English'': Thai board evokes hilarious replies | थायलंडमध्ये व्हायरल होतोय 'बोर्ड'; युजर्स म्हणाले, '...हे तर हास्यास्पद'  

थायलंडमध्ये व्हायरल होतोय 'बोर्ड'; युजर्स म्हणाले, '...हे तर हास्यास्पद'  

थायलंडमध्ये एका बोर्डचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून लोक आपले अनेक विचार मांडत आहेत. या ब्लॅकबोर्डवर लिहिले आहे की, "प्लीज, जर तुम्ही थायी बोलू शकत नाही, तर आमच्या इंग्रजीबाबत तक्रारी करू नका. आय लव्ह यू."

या पोस्टला आतापर्यंत 44.9 हजारवेळी रिट्विट केले आहे. तसचे, या पोस्टला 187.6 हजार लाइक्स मिळाल्या आहेत. ट्विटरवर याबद्दल एका युजर्सने ट्विट करत म्हटले आहे की, "कोण थायलंडला जात आहे आणि ते इंग्रजीबद्दलची काय तक्रार करत आहेत." तर दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे की, "मला आश्चर्य वाटले नाही...मी ऐकले आहे की सतत इंग्रजी बोलणारे (जास्तकरून अमेरिका) स्वत: दुसरी भाषा बोलू शकत नाहीत आणि ज्यावेळी दुसऱ्या देशांमध्ये जातात, तेव्हा तक्रारी सुरू करतात. हे तर हास्यास्पद आहे."

आणखी एकाने या पोस्टला रिट्विट करत म्हटले आहे की, "कोणत्याही बाहेरच्या देशात जाऊ नका आणि लोकांच्या इंग्रजीवरून तक्रारी करू नका." दुसरीकडे एका युजर्सने ट्विट केले आहे. यामध्ये "थायलंडचे लोक चांगले आहेत. तसेच, अनके लोक असे आहेत की आमच्यासोबत इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात. विशेषकरून फ्लाइट/टॅक्सीमधील लोक."

महत्त्वाच्या बातम्या

...म्हणून उत्तराखंडमध्ये उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिली जाणार रेल्वे स्थानकांची नावं

Budget 2020: प्रत्येक बजेटआधी हलवा करण्यामागचं 'शास्त्र' तुम्हाला माहीत आहे का?

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं? 

शिवसेनेच्या 'त्या' प्रस्तावाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा नाही; २०१४ मध्येच होणार होती महाविकास आघाडी?

3500 किलोमीटर दूरवर हवेतच नेस्तनाबूत होणार शत्रूचं विमान, K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी

Web Title: ''Don''t complain about our English'': Thai board evokes hilarious replies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.