OMG : अंगणात झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला 4 फुटांचा साप, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 18:29 IST2020-08-31T17:32:08+5:302020-08-31T18:29:33+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ नीट ऐकलात, तर तुम्हाला सर्व घटना कळेल.

doctors pulling snake out of woman’s throat, Watch Video  | OMG : अंगणात झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला 4 फुटांचा साप, अन्...

OMG : अंगणात झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला 4 फुटांचा साप, अन्...

बाईक्सच्या मडगाडमध्ये, इंजिनमध्ये... कारच्या बोनेटमध्ये... घराच्या छतांमध्ये... इतकेच काय तर टॉयलेट सीटमध्ये साप आढळल्याच्या किंवा शिरल्याच्या अनेक बातम्या आतापर्यंत वाचल्या असतील. पण, इथे एका महिलेच्या तोंडात चार फुटी साप शिरल्याची घटना समोर आली आहे. ही महिला घराच्या अंगणात झोपली असताना हा साप तिच्या तोंडात शिरला... आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेला हे कळलेही नाही. जेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करून त्या सापाला बाहेर काढले, तेव्हा सर्व प्रकार समोर आला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ नीट ऐकलात, तर तुम्हाला सर्व घटना कळेल. यात रशीयन महिलेच्या तोंडातून 4 फुटांचा साप बाहेर काढताना डॉक्टर दिसत आहे. वृत्तानुसार ही महिला अंगणात झोपली असताना हा साप तिच्या तोंडात शिरला असावा. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे महिलेनं हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेव्हा तिच्यावर शस्त्रक्रिया केली गेली आणि हा प्रकार समोर आला.  


डॅगेस्टानच्या आरोग्य मंत्र्यांनी या व्हिडीओची शहानिशा करण्याच्या सूचना केल्या आहेत.   

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Video: ट्वेंटी-20त 195 धावा करूनही पाकिस्तान पराभूत; इंग्लंडनं बदड बदड बदडले!

कोट्याधीश महेंद्रसिंग धोनीकडे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे 1,800 रुपये थकीत!

हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप

किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!

Web Title: doctors pulling snake out of woman’s throat, Watch Video