किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!

IPL मधील काही खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) तुफान फटकेबाजी करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 04:14 PM2020-08-31T16:14:09+5:302020-08-31T16:15:05+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2020 : Nicholas Pooran's maiden T20 ton fires Guyana Amazon Warriors to victory | किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!

किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) सुरू होण्यासाठी अवघे काही आठवडे राहिले आहेत. आयपीएलमध्ये खेळणारे भारतीय खेळाडू संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे दाखल झाले आहेत, परंतु संघातील परदेशी खेळाडू अद्यापही दाखल झालेले नाही. त्यात काही खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल) तुफान फटकेबाजी करत आहेत. त्यामुळे आयपीएल फ्रँचायझी मालकांचा उत्साहही वाढला आहे. किंग्स इलेव्हन पंजाबसाठी सोमवारी आनंदाची बातमी समोर आली आहे. 2019च्या लिलावात 4.2 कोटींत खरेदी केलेल्या विंडीजच्या खेळाडूनं सीपीएलमध्ये सोमवारी खणखणीत शतक झळकावलं. संघाला विजयासाठी आवश्यक असलेल्या 153 धावांमध्ये त्यानं एकट्यानं शतकी धावा चोपल्या. त्यामुळे आयपीएलच्या मोसमातही तो तशीच फटकेबाजी करेल, असा विश्वास किंग्स इलेव्हन पंजाबच्या फ्रँचायझींना आहे.

कोट्याधीश महेंद्रसिंग धोनीकडे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे 1,800 रुपये थकीत!

हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप

सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्स यांच्यात सोमवारी मध्यरात्री सामना खेळला गेला. त्यात प्रथम फलंदाजी करताना पॅट्रीओट्सनं 5 बाद 150 धावा केल्या. जोशूआ डा सिल्व्हानं 46 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 59 धावा केल्या. त्याला दिनेश रामदीननं 30 चेंडूंत 3 षटकारांसह 37 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे पॅट्रीओट्सनं 150 धावांपर्यंत मजल मारली. क्रिस ग्रीननं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना वॉरियर्सचे तीन फलंदाज 25 धावांत माघारी परतले. ब्रँडन किंग ( 14) याला अल्झारी जोसेफन माघारी पाठवलं. त्यानंतर जॉन-रूस जग्गेसारयानं वॉरियर्सच्या केव्हीन सिनक्लेअर ( 5) आणि शिमरोन हेटमायर ( 1) यांना बाद केले. पण, त्यानंतर निकोलस पूरन मैदानावर आला. त्यानं सामन्याची सूत्र हाती घेताना तुफान फटकेबाजी केली. त्यानं 45 चेंडूंत 4 चौकार व 10 खणखणीत षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या. रॉस टेलरनंही नाबाद 25 धावा केल्या.

किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी
2019च्या आयपीएलपूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला 4.2 कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. निकोलसला 2019च्या मोसमात 7 सामन्यांत 168 धावा करता आल्या आणि 48 ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. पण, त्याचा हा फॉर्म पाहता, यंदा युएईत तो चौकार-षटकारांची आतषबाजी करेल, अशी फ्रँचायझींना अपेक्षा आहे.

Web Title: CPL 2020 : Nicholas Pooran's maiden T20 ton fires Guyana Amazon Warriors to victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.