VIDEO : एकमेकांची तक्रार करण्यासाठी कपल पोलिसांकडे पोहोचलं, पोलिसांनी तिथंच लग्न लावून दिलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:09 PM2021-05-11T14:09:52+5:302021-05-11T14:10:32+5:30

Social Viral : इथे अनेक दिवसांपासून भांडत असलेल्या कपलचं लग्न पोलिसांनी पोलिस स्टेशनच्या आवारातच लावून दिलं. इतकंच नाही तर पोलिसांचे आशिर्वाद घेऊन हे जोडपं आपल्या दुचाकीवरून घरी गेलं. 

Couple marriage ceremony in police station video goes viral | VIDEO : एकमेकांची तक्रार करण्यासाठी कपल पोलिसांकडे पोहोचलं, पोलिसांनी तिथंच लग्न लावून दिलं!

VIDEO : एकमेकांची तक्रार करण्यासाठी कपल पोलिसांकडे पोहोचलं, पोलिसांनी तिथंच लग्न लावून दिलं!

Next

कोरोना काळात अनेक निराशाजनक बातम्या सतत समोर येत आहेत. तर दुसरीकडे काही विचित्र बातम्याही समोर येत आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या कोटामधून समोर आली आहे. इथे अनेक दिवसांपासून भांडत असलेल्या कपलचं लग्न पोलिसांनी पोलिस स्टेशनच्या आवारातच लावून दिलं. इतकंच नाही तर पोलिसांचे आशिर्वाद घेऊन हे जोडपं आपल्या दुचाकीवरून घरी गेलं. 

ही घटना आहे राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमधील. मिळालेल्या माहितीनुसार, रामगंजमंडीच्या मारुती नगरमधील रहिवासी असलेली २२ वर्षीय युवती आणि तरूण मोतीलाल यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होते. अशात संतापलेल्या तरूणीने प्रियकराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निश्चय केला. ती त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलिसांनी तिची तक्रार न घेता दोघांना समजावून हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. (हे पण वाचा  : ...म्हणून २ वर्षाच्या मुलासह प्रेयसी प्रियकराच्या घराबाहेर ४ दिवस ठाण मांडून बसली; नेमकं काय घडलं?)

पोलिसांनी सोमवारी प्रियकर आणि दोघांच्याही कुटुंबीयांनी समजावलं. नंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनं पोलीस स्टेशनमध्येच  असलेल्या एका मंदिरात दोघांचं लग्न लावून दिलं. यानंतर या जोडप्यानं पोलिसांसह आपल्या कुटुंबियांचा आशिर्वाद घेतला. (हे पण वाचा : कोरोनाचा असाही फायदा! घटस्फोटासाठी अर्ज केलेल कपल पुन्हा सोबत रहायला तयार....)

मजेदार बाब म्हणजे या आगळ्या वेगळ्या लग्नासाठी एका पत्रकाराने पंडिताची जबाबदारी पार पाडली. लग्नावेळी दोघांचे कुटुंबीयही तिथेच उपस्थित होते. पोलिसांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. सध्या हा चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियामध्येही बराच शेअर झाला आहे.
 

Web Title: Couple marriage ceremony in police station video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.