...म्हणून २ वर्षाच्या मुलासह प्रेयसी प्रियकराच्या घराबाहेर ४ दिवस ठाण मांडून बसली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 02:05 PM2021-05-09T14:05:56+5:302021-05-09T14:07:05+5:30

पोलिसांच्या उपस्थितीत प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात समझौता झाल्यानंतर शनिवारी दोघांनीही घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु कुटुंबातील सदस्यांनी त्यांना अडवलं.

Lover Adopted Girlfriend Sitting On Dharna, Family Members Did Not Enter In Jaunpur | ...म्हणून २ वर्षाच्या मुलासह प्रेयसी प्रियकराच्या घराबाहेर ४ दिवस ठाण मांडून बसली; नेमकं काय घडलं?

...म्हणून २ वर्षाच्या मुलासह प्रेयसी प्रियकराच्या घराबाहेर ४ दिवस ठाण मांडून बसली; नेमकं काय घडलं?

Next
ठळक मुद्देपोलिसांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तरीही कुटुंबाने दरवाजा उघडण्यास नकार दिला.पोलिसांनी या दोघांना तुमची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगून तिथून निघून गेले.सध्या हे दोघंही घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या झाडाखाली वास्तव्य करत आहेत.

जौनपूर – महाराजगंज परिसरातील केवटली गावात प्रियकराच्या घराबाहेर २० महिन्याच्या मुलासह प्रेयसी ठाण मांडून बसल्याची अनोखी घटना घडली आहे. अखेर ४ दिवसांनी प्रियकराने प्रेयसीचा स्वीकार केला परंतु कुटुंबाने तिला घरात प्रवेश नाकारला म्हणून सध्या हे दोघंही घरापासून दूर एका झाडाखाली बसून राहिले आहेत. बदलापूरचे सीओ चोप सिंह यांच्या मध्यस्थीने या दोघांनी एकत्र राहण्यासाठी तडजोड केली आहे.

पोलिसांच्या उपस्थितीत प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात समझौता झाल्यानंतर शनिवारी दोघांनीही घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु कुटुंबातील सदस्यांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तरीही कुटुंबाने दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना तुमची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगून तिथून निघून गेले. सध्या हे दोघंही घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या झाडाखाली वास्तव्य करत आहेत.

प्रियकर कमरूल यांचे म्हणणं आहे की, वडिलांनी घरातील एक रूम तिला देण्यास सांगितली. परंतु आता त्यांचा मोबाईल बंद येतोय. ३ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पुढे काय करायचं ते पाहू. ४ दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या प्रेयसीच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त पोलिसांनी तिच्या मोठ्या सासूकडे केला होता. सीओ चोप सिंह स्वत: घटनास्थळी पोहचले होते. महिलेच्या प्रियकराला त्याठिकाणी बोलावून दोघांमधील वाद मिटवला.

काय आहे नेमकं प्रकरण?

विवाहित प्रेयसी तिच्या २० महिन्याच्या मुलासह प्रियकराच्या घराबाहेर ठाण मांडून बसली. तर दुसरीकडे तिचा नवरा पत्नीला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनच्या चक्करा मारत होता. केवटली परिसरात राहणाऱ्या विवाहित महिलेला एका युवकावर प्रेम जडलं. २० महिन्याचा मुलगाही प्रियकराचा असल्याचा दावा महिलेचा आहे. लॉकडाऊनमध्ये महिलेचा पती कोलकाताहून परतला होता तेव्हा महिला आधीच तिच्या माहेरी कोलकात्याला गेली होती. प्रियकराने २८ एप्रिलला वाराणसीला बोलावलं तेव्हा ३ दिवस प्रियकराच्या बहिणीने तिथेच थांबवलं. प्रियकराच्या वडिलांचे म्हणणं आहे की, नवऱ्याशी घटस्फोट घेऊन ये तर माझ्या मुलासोबत लग्न लावेन तर दुसरीकडे भावाने आणि वडिलांनी प्रियकराला धाक दाखवून पळवलं आहे असं महिलेचा आरोप होता. तिचा नवरा तिच्यासोबत राहण्यास तयार होता परंतु घरच्यांच्या दबावामुळे त्याला काही करता येत नव्हते.

 

Web Title: Lover Adopted Girlfriend Sitting On Dharna, Family Members Did Not Enter In Jaunpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Policeपोलिस