शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

लंडनमधल्या या बस चालतात कॉफीवर , नैसर्गिक संसाधनांचा असाही वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 3:18 PM

लंडनमध्ये बस परिवहनाने इंधन म्हणून कॉफीचा वापर सुरु केला आहे. त्यातून नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न आहे,

ठळक मुद्देअसाच उपक्रम जर जगभरातील सगळ्याच देशांनी राबवला तर येत्या काही वर्षात नैसर्गिक संसाधनांची होणारी हानी रोखता येईल.लंडनच्या परिवहनने या बायोफ्यूअलचा वापर वाढवला आहे. लंडनमध्ये पेट्रोलच्या वाढत जाणाऱ्या किंमती आणि संसाधनांचा होणारा अतिरिक्त वापर रोखण्यासाठी एक हटके पद्धत शोधून काढली आहे.

लंडन : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढताहेत. तसंच पेट्रोल आणि डिझेल ही संसाधनं नैसर्गिक असल्याने संपुष्टात येण्याची शक्यता आहे. म्हणून या संसाधनांचा जपून वापर केला पाहिजे अशी जनजागृतीही केली जाते. मात्र तरीही आपल्याकडून या संसाधनांचा अतिरिक्त वापर केला जातोय. पण लंडनमध्ये पेट्रोलच्या वाढत जाणाऱ्या किंमती आणि संसाधनांचा होणारा अतिरिक्त वापर रोखण्यासाठी एक हटके पद्धत शोधून काढली आहे. तिकडच्या बसेस सध्या कॉफीवर चालत आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. कॉफीपासून निघणाऱ्या तेलापासून या बसेस चालवल्या जात आहेत. 

अाणखी वाचा - या कंपन्या भारतीय नसूनही आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत

बीबीसी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधील परिवहनाने हल्लीच हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. कॉफीपासून निघणाऱ्या कचऱ्याच्या तेलाचा वापर इंधन म्हणून केला जात आहे. या तेलाला ब्लेंडिंग ऑईल असं म्हणतात. या ब्लेंडिंग ऑईलला डिझेलमध्ये टाकून बायोफ्यूअल बनवलं जातं. हेच बायोफ्यूअल लंडनच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरलं जात आहे. हा उपक्रम जर लंडनमध्ये यशस्वी ठरला तर याचा फायदा जगभर होऊ शकतो.

आणखी वाचा - हे पुर्ण कुटूंब घेतंय लखपती भिकाऱ्याचा शोध

 

लंडन येथील बायो-बीन या कंपनीचं असं म्हणणं आहे की, या बायोफ्यूअलपासून एका गाडीसाठी पूर्ण पॉवर मिळते. त्यामुळे लंडनच्या परिवहनने या बायोफ्यूअलचा वापर वाढवला आहे.  या कंपनीचं असंही म्हणणं आहे की कॉफी कारखान्यातून एका वर्षात कॉफीतून २ लाख टन कचरा तयार होतो. हा कचरा बायोफ्यूअल बनवणाऱ्या कंपन्या इथून उचलतात आणि त्यापासून बायोफ्यूअल तयार केला जातो. लंडनमधील जवळपास ९ हजार ५०० बसेस या बायोफ्यूअलचा वापर करत आहेत. 

आणखी वाचा - ऐकावं ते नवलच! गर्लफ्रेण्डला इम्प्रेस करायला ते तिघे करायचे चोरी

बीन-बायो या कंपनीने सांगितल्याप्रमाणे २.५ मिलिअन कॉफीपासून तयार होणारा कचरा एका बससाठी संपूर्ण वर्षभर चालू शकतो. बायोफ्यूअलमुळे संपत जाणाऱ्या नैसर्गिक संसाधनांवरचा भार कमी होईल तसेच, या संसाधनांच्या किंमतीही वाढणार नाहीत. असाच उपक्रम जर जगभरातील सगळ्याच देशांनी राबवला तर येत्या काही वर्षात नैसर्गिक संसाधनांची होणारी हानी रोखता येईल.

सौजन्य - www.bbc.com

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयLondonलंडन