या कंपन्या भारतीय नसूनही आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 04:31 PM2017-11-28T16:31:23+5:302017-11-28T16:32:53+5:30

भारतात या काही कंपन्या गेली अनेक वर्ष वस्तु आणि सेवा पुरवत आहेत. आपल्या रोजच्या जीवनात त्यांच्या अनेक वस्तु असतात.

foreign companies setteled in India after globalization | या कंपन्या भारतीय नसूनही आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत

या कंपन्या भारतीय नसूनही आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत

googlenewsNext

मुंबई : जागतिकीकरणानंतर भारतात अनेक विदेशी कंपन्या आल्या. या परदेशी कंपन्याचे निरनिराळ्या वस्तु आणि सेवा भारतीयांनी आपल्याशा केल्या. भारतात वाढलेला खप पाहता संबंधित कंपन्यांनी भारतात आपलं बस्तान मांडलं. त्यामुळे अनेक भारतीयांना या संबंधित कंपन्या भारतातीलच आहेत असा पक्का समज झाला आहे. या कंपन्यांमुळे आपल्या स्थानिक कंपन्या मागे राहिल्या आहेत हेही सांगण्याची गरज नाही. मात्र कंपन्यांची नावे, त्यांची उत्पादनं आवडल्याने भारतीयांनी या कंपन्याना आणि त्यांच्या वस्तुंना आपलंस करून घेतलं आहे. अशाच काही कंपन्यांविषयी आज आपण पाहुया.

कॅडबरी

आपल्याकडे लहानांपासून मोठ्यापर्यंत ज्या चॉकलेटने लळा लावला ते चॉकलेट म्हणजे कॅडबरी. अगदी पाच रुपयापासून मिळणारं हे चॉकलेट सगळ्यांनाच आवडतं. कॅडबरीने त्यांची स्वत:ची इतकी चांगली ओळख बनवून घेतली आहे की इतर चॉकलेटच्या कंपन्या भारतात असल्या तरीही आपण मागताना कॅडबरी द्या असंच मागतो. कॅडबरी ही कंपनी मुळची ब्रिटीशांची. १८४७ साली जॉन कॅडबरी आणि त्याच्या भावाने इंग्डलमध्ये हा व्यवसाय सुरू केला. खरंतर सुरुवातीला जॉन कॅडबरी यांचं चहा विकण्याचा व्यवसाय होता. त्यावेळी ते चॉकलेट पेयही विकत होते. त्यातून प्रेरणा घेता त्यांनी त्यांच्या भावाच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला. सध्या या कंपनीचा मुख्य कार्यालय आहे अक्सब्रिज, वेस्ट लंडन येथे. कॅडबरी कंपनी जवळपास जगभरात ५० देशात व्यवसाय करते. २०१० साली मोंडेलोज इंटरनॅशनल यांनी हा व्यवसाय ताब्यात घेतला. 

आणखी वाचा - तुमचं आवडतं चॉकलेट ठरवतो तुमचा स्वभाव

हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी

हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीला भारतीय नाव असलं तरीही ही मुळची भारतीय कंपनी नाही. इंग्लडच्या युनिलिव्हर कंपनीने भारतात त्यांची शाखा सुरू केली आहे. या कंपनीचंही मुख्य कार्यालय लंडनमध्येच आहे. भारतात ही कंपनी जेवढं कमवते त्यापैकी ६७ टक्के भाग इंग्डलाच मिळतो. युनिलिव्हर कंपनीचे अनेक उत्पादन भारतात विकले जातात. खाद्य पदार्थांपासून ते घरगुती सामानांपर्यंत अनेक वस्तू या कंपनीद्वारे विकल्या जातात. १८७२ साली ही कंपनी इंग्लडमध्ये स्थापन झाली. त्यानंतर भारतात ही कंपनी लिवर ब्रदर्स या नावाने १९३३ साली सुरू झाली. १९५६ साली या कंपनीचं नामांतरण होऊन हिंदुस्तान लिवर लिमिटेड करण्यात आलं. त्यानंतर २००७ च्या जूनमध्ये या कंपनीचं नाव हिंदुस्तान युनिलिवर कंपनी असं ठेवण्यात आलं. 

अॅमेझॉन

ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असणारी अॅमेझॉन ही कंपनीही विदेशी आहे. अॅमेझॉनने भारतात आपलं जाळं विस्तारलं असलं तरीही ही एक अमेरिकन ट्रेडींग कंपनी आहे. ५ जुलै १९९४ साली ही कंपनी स्थापन झाली. सध्या वॉशिंग्टनच्या सिटल या शहरात या कंपनीचं मुख्यालय आहे. बुकस्टोर म्हणून या कंपनीने ऑनलाईन ट्रेडिंग सुरू केली होती. मात्र कालांतराने त्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवायलाही सुरुवात केली. १७ ते १८ देशात या कंपनीचा व्यवसाय असून प्रत्येक देशासाठी वेगळी वेबसाईट आहे. जेणेकरून प्रत्येक देशातील नागरिका त्यांचे स्थानिक उत्पादक खरेदी करू शकतील. सध्या ऑनलाईन शॉपिंगला बरीच चालना मिळाल्याने अॅमेझॉन ही कंपनीही जोरात सुरू आहे. वेगवेगळे ऑफर्स देऊन ही कंपनी जगभरातील ग्राहकांना आकर्षित करत असते. 

आणखी वाचा - अॅमेझॉन कर्मचारी तब्बल ५५ तासांच्या ड्युटीनंतर इतके थकले की गेले थेट हॉस्पिटलमध्ये

लोरिअल 

सौंदर्य प्रसाधनासाठी प्रसिद्ध असलेली लोरिअल ही कंपनी मुळची फ्रेंच कंपनी आहे. केस, चेहरा, मेकअप, परफ्यूम अशा विविध साधनांसाठी ही जगभर फार प्रसिद्ध  झाली आहे. त्याचप्रमाणे भारतातही या कंपनीचे अनेक ग्राहक आहेत. १९११ साली पॅरिसमध्ये या कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीला या कंपनीत केवळ एकच केमिस्ट होता. मात्र कालांतराने या कंपनीचा व्याप वाढत गेला. आता जगभरात या कंपनीचे केमिस्ट सापडतात. तरुणींनाही आता या उत्पादनाची भुरळ पडली आहे. त्यामुळे पॅरिसमधून सुरू  झालेला हा व्यवसाय आता जगभरातील अनेक नामवंत देशात पसरला आहे, त्याचप्रमाणे भारतातही या व्यवसायाने हात-पाय पसरले असून भारतीयांनी या उत्पादनांना आपलेसे केले आहे. 

नेसले

कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली नेसले ही कंपनी स्वित्झर्लंडची आहे. या कंपनीचं मुख्यालय स्वित्झर्लंडच्या वॉड या शहरात आहे. जगातील सगळ्यात मोठी खाद्य उत्पादन करणारी कंपनी म्हणून या कंपनीला गणलं जातं. १८८६ साली या कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर कालांतराने या कंपनीने युरोप आणि युनायटेड स्टेटमध्येही आपला व्यवसाय सुरू केला. आता या कंपनीचे चॉकलेट, बिस्किट्स, दुग्धजन्य पदार्थ, लहानमुलांचे खाद्यपदार्थ, चहा-कॉफी पावडर आदी उत्पादन जगभर विकली जातात. 

Web Title: foreign companies setteled in India after globalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.