प्रियकराचं होत होतं लग्न, अचानक पोहोचली एक्स गर्लफ्रेन्ड; एकाच मंडपात दोन २ नवरींसोबत केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 13:31 IST2021-07-30T13:27:25+5:302021-07-30T13:31:09+5:30
इंडोनेशियाच्या Lombok Tengah राहणाऱ्या २० वर्षीय Nur Khusnul Kotimah साठी हा कठीण काळ होता. पण तिने तिच्या होणाऱ्या पतीचा सन्मान केला.

प्रियकराचं होत होतं लग्न, अचानक पोहोचली एक्स गर्लफ्रेन्ड; एकाच मंडपात दोन २ नवरींसोबत केलं लग्न
इंडोनेशियामध्ये एका नवरदेवाची एक्स गर्लफ्रेन्ड अचानक त्याच्या लग्ना पोहोचली आणि तिने त्याच्या होणाऱ्या पत्नीला आश्चर्याचा धक्का दिला. लोक तिला काही विचारतील किंवा दुसरं काही होण्याआधी तिने प्रियकरासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. इतकंच नाही तर नवरदेवानेही लग्नासाठी होकार दिला. इंडोनेशियाच्या Lombok Tengah राहणाऱ्या २० वर्षीय Nur Khusnul Kotimah साठी हा कठीण काळ होता. पण तिने तिच्या होणाऱ्या पतीचा सन्मान केला.
ती सुद्धा पतीची एक्स गर्लफ्रेन्ड Yunita Ruri सोबत त्याच्या लग्नाला आनंदाने तयार झाली. नूर नुसार, तिचा पती Korik Akbar ची एक्स गर्लफ्रेन्ड Yunita Ruri ला त्याच्या लग्नाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं होतं. ज्यानंतर ती प्रियकराच्या लग्नात पोहोचली आणि तिने त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
तेच कोरिकने मीडियाला सांगितलं की, तो तिच्या एक्स गर्लफ्रेन्डच्या अशा अचानक येण्याने हैराण झाला होता. त्याला असं काही होईल याचा अजिबात अंदाज नव्हता. अखेर परिवारासोबत चर्चा केल्यानंतर त्याने निर्णय घेतला की, तो दोन्ही तरूणींसोबत लग्न करेल. अशाप्रकारे एकाच मंडपात एक नवरदेव आणि दोन नवरींचं लग्न लावण्यात आलं. आता तिघांनी एका नव्या जीवनाला सुरूवात केली आहे.