बाबो! नवरदेव राहिला बाजुला, नववधूच्या बॉयफ्रेंडनेच मारला डान्स पे चान्स; Video तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 19:29 IST2022-12-16T19:19:24+5:302022-12-16T19:29:06+5:30
वधू व्हिडीओमध्ये खूप डान्स करताना दिसत आहे पण यामध्ये ती तिच्या नवऱ्याला सोडून प्रियकरासह नाचताना दिसत आहे.

बाबो! नवरदेव राहिला बाजुला, नववधूच्या बॉयफ्रेंडनेच मारला डान्स पे चान्स; Video तुफान व्हायरल
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास प्रसंग असतो आणि या निमित्ताने लोक खूप मजा करतात. विशेषत: लग्नातील डान्सबाबत लोकांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. या दिवशी लोक धमाल करतात. मात्र आजकाल नववधूही त्यांच्या लग्नात जोरदार डान्स करताना पाहायला मिळतात. असे अनेक लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे खूप मजेदार आहेत आणि युजर्सही त्याचा खूप आनंद घेतात. असाच एक भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वधू व्हिडीओमध्ये खूप डान्स करताना दिसत आहे पण यामध्ये ती तिच्या नवऱ्याला सोडून प्रियकरासह नाचताना दिसत आहे. अनेकवेळा लग्नांमध्ये अशा घटना घडतात, ज्या पाहून लोक आश्चर्यचकित होतात. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोक अशा घटना रेकॉर्ड करून व्हायरल करतात आणि हे पाहून लोकांनाही हसू आवरत नाहीत. व्हायरल व्हिडिओमध्ये, नववधू गोविंदा आणि राणी मुखर्जीच्या 'तुझको ही दुल्हन बनाऊंगा' या गाण्यावर तिच्या प्रियकरासह नाचताना दिसत आहे. दोघांचा डान्स पाहण्यासाठी घराबाहेर गर्दी झाली आहे, तर नवरदेव शांत उभा आहे.
इस शादी के सीजन में क्या क्या देखना पड़ रहा है 😂 pic.twitter.com/WMwXyA3BPD
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) December 15, 2022
वधू तिच्या प्रियकरासह जोरदारपणे नाचते आणि नाचताना दोघेही मिठी मारतात. या दोघांना एकमेकांपासून लांब करण्यासाठी एक महिला पुढे आल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती दोघांनाही एकमेकांपासून लांब करत आहे, तर दोघेही एकमेकांना सोडायला तयार नाहीत. दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. हा व्हिडीओ जॅकी यादव नावाच्या युजरने शेअर केला आहे. यासोबत त्याने हटके कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"