भाऊ बनून प्रेयसीच्या सासरी पोहोचला प्रियकर, पतीने रात्री बघितलं असं काही बोलवावे लागले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 13:13 IST2022-05-25T13:12:42+5:302022-05-25T13:13:21+5:30

Uttar Pradesh : पतीने रागाच्या भरात कथित भावाला आपल्या पत्नीला मारण्यापासून रोखलं. पण पत्नीने आपल्या पतीला रोखलं. पत्नी सांगितलं की, हा तिचा प्रियकर आहे.

Boyfriend reached to newly wed girlfriend house and know whats happen | भाऊ बनून प्रेयसीच्या सासरी पोहोचला प्रियकर, पतीने रात्री बघितलं असं काही बोलवावे लागले पोलीस

भाऊ बनून प्रेयसीच्या सासरी पोहोचला प्रियकर, पतीने रात्री बघितलं असं काही बोलवावे लागले पोलीस

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हरदोईमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रेयसीच्या सासरी गेला होता. तो तिच्या सासरी तिचा भाऊ बनून गेला होता. घरातील लोकांना या भावावर संशय तर होता, पण नवरी नवीन असल्याकारणाने लोक सूनेला काही म्हणू शकले नाहीत. सोमवारी रात्री तरूणीच्या पतीने पत्नी आणि तिच्या कथित भावाला एकमेकांना मारहाण करताना पाहिलं. ज्यानंतर या प्रकरणाची पोलखोल झाली. 

पतीने रागाच्या भरात कथित भावाला आपल्या पत्नीला मारण्यापासून रोखलं. पण पत्नीने आपल्या पतीला रोखलं. पत्नी सांगितलं की, हा तिचा प्रियकर आहे. त्याला कुणीही मारू नका. हे सगळं ऐकून सासरच्या लोकांना धक्का बसला. सासरच्या लोकांनी याची सूचना पोलिसांना आणि तरूणीच्या कुटुंबियांना दिली. ज्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. पोलीस दोन्हीकडील लोकांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले, जिथे ती वयस्क असल्याचा हवाला देत म्हणाली की, तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचं आहे. नंतर पोलिसांनी प्रकरण शांत करत दोघांना सोबत पाठवून दिलं.

ही घटना हरदोईच्या शाहबादची आहे. तरूणीचं लग्न १४ मे रोजी झालं होतं आणि २२ मे रोजी तिचा प्रियकर कानपूरहून हरदोई आपल्या प्रेयसीच्या सासरी पोहोचला होता. २३ मे च्या रात्री तरूण आपल्या प्रेयसीला मारहाण करत होता. तेव्हा तिच्या पतीने तिला पाहिलं. त्यानंतर २४ मे रोजी प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं. इथे पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला सोबत पाठवलं.

असं सांगितलं जात आहे की, तरूण आणि तरूणी एकाच कोचिंग क्लासेसमध्ये शिकत होते. जिथे दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. काही दिवसांनंतर तरूण कानपूरच्या कल्याणपूरमधील आपल्या घरी गेला. इकडे १४ मे रोजी प्रेयसीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न एका तरूणासोबत लावून दिलं. त्यानंतर प्रियकर तिचा मावस भाऊ म्हणून तिच्या सासरी गेला. जिथे प्रेयसीला मारताना त्याला तिच्या पतीने बघितलं.

पतीसमोर भांडाफोड झाला तर तिने पत्नीसोबत राहण्यास आणि वडिलांच्या घरी परत जाण्यास नकार दिला. प्रेयसीने चौकशी दरम्यान सांगितलं की, कुटुंबियांनी तिचं जबरदस्ती लग्न लावून दिलं. ती वयस्क आहे. चांगलं-वाईट तिला समजतं. त्यामुळे ती प्रियकरासोबत जाईल. 
 

Web Title: Boyfriend reached to newly wed girlfriend house and know whats happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.