सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यापासून विविध प्रकारची स्टंटबाजी करणाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दुचाकी खांद्यावर घेऊन रेल्वेचे रूळ पार करताना दिसच आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांकडून शेअर केला जात असून, त्यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. काहीजण या स्टंटबाजीचं कौतुक करत आहेत. तर काहीजण या बेफिकीर व्यक्तीवर टीकाही करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर फाटक बंद असल्याचं दिसत आहे. तरीही एक व्यक्ती फाटकाजवळ असलेली दुचाकी आरामात उचलून खांद्यावर घेताना दिसत आहे. त्यानंतर अजिबात न अडखळता तो रेल्वे ट्रॅक पार करून जाताना दिसत आहे.
अवघ्या १८ सेकंदांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच व्हिडीओमध्ये रेल्वेच्या रुळांच्या दोन्ही बाजूंना लोक उभे असलेले दिसत आहेत. मात्र ही व्यक्ती रेल्वेचं फाटक उघडण्याची वाट न पाहता त्याच्याकडील दुचाकी खांद्यावर उचलून घेऊन जाताना दित आहे. हा व्हिडीओ घर का कलेश नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला असून, या व्हिडीओबाबत प्रेक्षकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.