शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बालकलाकारांच्या चित्तथरारक कसरतीने वेधले लक्ष

By admin | Updated: May 3, 2014 16:19 IST

सिडको : साई मंदिर उत्सवास प्रारंभ

सिडको : साई मंदिर उत्सवास प्रारंभसिडको : जुन्या सिडकोतील श्री साईनाथ मंदिराच्या तिसर्‍या वर्धापनदिनास साईपालखी मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ झाला. कोल्हापूरच्या बाल मंडळाच्या बालकलाकारांनी सादर केलेल्या साहसी, चित्तथरारक शारीरिक कसरती या पालखी मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.जुन्या सिडकोतील श्री साईनाथ मंदिराच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त तीनदिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साईपालखी मिरवणुकीने या उत्सवास प्रारंभ झाला. साईनाथ मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. शिवसेना नेते जयंत दिंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून साईपालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. कोल्हापूरच्या बाल मंडळाचे पथक, मालेगावचे हलगी पथक यासारखे वाद्यवृंद, विद्युत रोषणाई केलेली पालखी, भालदार-चोपदार हे या सोहळ्याचे खास आकर्षण होते. शिवाजी चौक, राणाप्रताप चौक, तुळजा भवानी मंदिर, शांतीनगर या परिसरातून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली. साईपालखीचे प्रत्येक चौकात साईभक्तांनी पालखी मार्गावर सडा, रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून स्वागत केले. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाला होता.या मिरवणुकीत ओम साईनाथ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तिदमे, विक्रम काळे, किरण भामरे, चंद्रकांत कानकाटे, पोपटराव हगवणे, बाळासाहेब सोनवणे, जिभाऊ अहिरे, संदीप पांडे, पद्माकर काळे, देवीदास देवकर, सुनील निकुंभ, नाना काळे, नाना पाटील, गिरीश जोशी यांसह साईभक्त व महिला सहभागी झाले होते. दरम्यान, शनिवार, दि. ३ मे रोजी महाप्रसादाने या साई उत्सवाची सांगता होणार आहे. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. (वार्ताहर)