बोंबला! दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून विजेच्या खांबावर चढले ६० वर्षीय आजोबा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 09:30 IST2021-03-10T09:27:02+5:302021-03-10T09:30:16+5:30

या आजोबांना दुसरं लग्न करायचं आहे आणि असं करून ते परिवारावर आणि मुलांवर दबाव टाकत होते.

60 years old man electric pole climb up stubbornness second marriage Dholpur Rajasthan | बोंबला! दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून विजेच्या खांबावर चढले ६० वर्षीय आजोबा आणि मग...

बोंबला! दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून विजेच्या खांबावर चढले ६० वर्षीय आजोबा आणि मग...

राजस्थानच्या धौलपूरमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका पाच मुलांचे वडील असलेल्या  ६० वर्षीय वयोवृद्धाने ११ हजार वोल्टेजच्या विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. असे सांगितले जात आहे की, या आजोबांना दुसरं लग्न करायचं आहे. आणि असं करून ते परिवारावर आणि मुलांवर दबाव टाकत होते. महत्वाची बाब म्हणजे या आजोबांना अनेक नातवंडेही आहेत.

या घटनेची माहिती वयोवृद्धाच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना लागली तर एकच गोंधळ उडाला. सुदैवाने ज्यावेळी ही व्यक्ती विजेच्या खांबावर चढली तेव्हा तारांमध्ये करंट नव्हता. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. कुटुंबियांनी लगेच या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी लगेच कारवाई केली. 

कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी खूप समजावल्यावर ही व्यक्ती खाली उतरली. तेव्हा गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. रिपोर्टनुसार, चार वर्षांआधी या व्यक्तीच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्याला तीन मुलं आणि दोन मुली आहेत. पाचही लेकरांची लग्नेही झाली आहेत. त्याला नातवंडेही आहेत. तरी ही व्यक्ती दुसरं लग्न करण्याच्या जिद्दीत खांबावर चढली. त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. (हे पण वाचा : बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...)

सोबरन सिंह असं या व्यक्तीचं नाव असून चार वर्षांआधी त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर तो दुसऱ्या लग्नासाठी तगादा लावत होता. पण यासाठी त्याची मुले तयार नव्हती. त्यामुळे गेल्या रविवारी ७ मार्चला सोबरनने रागात येऊन परिवारावर लग्नासाठी दबाव टाकण्यासाठी खांबावर चढला. 

याबाबत पोलीस अधिकारी सुमन कुमार यांनी सांगितले की, 'एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याची माहिती काढली तर एक ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती दुसरं लग्न लावून द्यावं ही मागणी करण्यासाठी विजेच्या खांबावर चढली होती. ज्यानंतर गावकऱ्यांनी तत्परता दाखवत वीज कापली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना फोन केला. त्यानंतर कसंतरी समजावून त्या व्यक्तीला खाली उतरवलं. 
 

Web Title: 60 years old man electric pole climb up stubbornness second marriage Dholpur Rajasthan