41 वर्षाची नवरी अन् 16 वर्षाचा नवरदेव, लग्नाचं कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 10:57 IST2023-08-09T10:55:33+5:302023-08-09T10:57:39+5:30

Weird Marriage : 41 वर्षीय महिलेने तिच्यापेक्षा 25 वर्षाने लहान मुलासोबत लग्न केलं. म्हणजे महिलेचं लग्नाचं वय निघून गेलं होतं आणि मुलाचं लग्नाचं वय व्हायचं होतं.

41 year old woman married to 16 year old boy reason will shock you | 41 वर्षाची नवरी अन् 16 वर्षाचा नवरदेव, लग्नाचं कारण वाचून व्हाल हैराण

41 वर्षाची नवरी अन् 16 वर्षाचा नवरदेव, लग्नाचं कारण वाचून व्हाल हैराण

Weird Marriage : असं म्हणतात की, जेव्हा व्यक्ती प्रेमात पडतात तेव्हा त्यांना दुसरं काही दिसत नाही. मोठ्यातली मोठी गोष्ट त्यांना छोटीच वाटते आणि ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण बऱ्याचदा कोणतंही साम्य किंवा प्रेम नसतानाही काही लोक लग्नाच्या बंधनात अडकतात. वृद्ध लोकही तरूणींसोबत लग्न करतात. पण इंडोनेशियात सध्या एक वेगळ्याच लग्नाची चर्चा सुरू आहे. इथे एका महिलेने असं काही केलं जे तुम्ही आधी पाहिलं नसेल.

मिररच्या रिपोर्टनुसार, इथे राहणाऱ्या 41 वर्षीय महिलेने तिच्यापेक्षा 25 वर्षाने लहान मुलासोबत लग्न केलं. म्हणजे महिलेचं लग्नाचं वय निघून गेलं होतं आणि मुलाचं लग्नाचं वय व्हायचं होतं. तरीही धुमधडाक्यात त्यांचं लग्न झालं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरलही झाले. दोघेही यात आनंदी दिसत आहेत.

मारियाना नावाच्या महिलेचं वय 41 वर्ष आहे आणि ज्याच्यासोबत तिने लग्न केलं त्याच वय 16 आहे. पण महिलेला याने काही फरक पडत नाही. तिने West Kalimantan Province येथील एका व्हेन्यूवर 30 जुलैला शाही लग्न केलं. दोघेही लग्नाच्या ड्रेसमध्ये होते आणि वेडिंग रिंग दाखवत होते. 

मारियानाची सासू म्हणजे मुलाची आई मारियानापेक्षा 4 वर्षानी लहान आहे. दोघी चांगल्या मैत्रिणीही आहेत. तिने दोघांचं लग्न लावून दिलं. आईच्या सहमतीनेच लग्न झालं त्यामुळे ते बेकायदेशीरही नाही.

या लग्नामागचं कारण सांगत मुलाच्या आईने सांगितलं की, मारियाना तिची मैत्रीण आहे आणि आधीच्या रिलेशनशिपमध्ये तिला फार दु:खं झेलावं लागलं. ती डिप्रेशनमध्ये होती, त्यामुळे तिने मैत्रिणीच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आपल्या मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं. 

41 वर्षीय मारियाना एक यशस्वी बिझनेसवुमन आहे आणि तिची ग्रोसरी स्टोर्सची एक चेन आहे. कपलचं यावर मत आहे की, त्यानी 2 महिने डेट केल्यानंतर लग्न करण्याचं ठरवलं. इंडोनेशियाच्या चाइल्ड प्रोटेक्शन कमीशन याची एंट्री करताना सांगितलं की, मुलगा 18 वयापेक्षा कमी आहे. अशात जोपर्यंत प्रकरणाची चौकशी होईल कपलला वेगळं रहावं लागेल. 
 

Web Title: 41 year old woman married to 16 year old boy reason will shock you