नशिराबाद उड्डाणपुलाला झिपरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST2021-05-05T04:25:55+5:302021-05-05T04:25:55+5:30

नशिराबाद : नशिराबाद येथे महामार्गावर भांड्यातल्या उड्डाणपुलाला ग्रामदैवत झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी झिअम फाउंडेशनचे ...

Zippu to Nasirabad flyover | नशिराबाद उड्डाणपुलाला झिपरू

नशिराबाद उड्डाणपुलाला झिपरू

नशिराबाद : नशिराबाद येथे महामार्गावर भांड्यातल्या उड्डाणपुलाला ग्रामदैवत झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी झिअम फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून मुंबई, पुणे, विदर्भ, गुजरात व इतर राज्ये यासह परदेशातील भाविक या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाला येतात. उड्डाणपुलाला झिपरू अण्णा महाराजांचे नाव देण्याने गावात वैभव व नावलौकिक भर व चैतन्य निर्माण होईल आणि परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या नावाने नशिराबाद जवळील उड्डाणपुलाला संबोधित करण्यात यावे योग्य विचार करून उड्डाणपुलाच्या लवकरात लवकर नामकरण करावे अशी मागणी झिअम फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाचे सिन्हा यांच्याकडे केली आहे. यावेळी झिअम फाऊंडेशनचे सदस्य दीपक जावरे, आकाश देवळे आदी उपस्थित होते.

Web Title: Zippu to Nasirabad flyover