शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

गाते येथील जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:14 IST

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गाते जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षक पदावरून कमल गोविंदा ढाके यांना निलंबित करीत असल्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांनी पारीत केले आहेत.

ठळक मुद्देतांदलवाडी माध्यमिक शाळा शि.प्र.मंडळाच्या संचालकांना गुजरी मातृभाषेचा निर्गमन उतारा दिल्याची तक्रारशाळा सोडल्याच्या दाखल्यासह नमुना नंबर एकवर कुठेही गुजर मातृभाषा असल्याचा उल्लेख नव्हता

रावेर, जि.जळगाव : गुजर वा गुजराती मातृभाषेवर आधारित एकही शाळा अस्तित्वात नसताना तथा शाळा सोडल्याचा दाखला वा जनरल रजिस्टरमधील नमुना नंबर १ वर गुजर मातृभाषेचा उल्लेख नसताना तांदलवाडी माध्यमिक शाळा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त व संचालकांना विनातारखेचा निर्गमन उतारा देताना बेकायदेशीरपणे क्रमांक सहाच्या रकान्यात मराठी ऐवजी गुजर मातृभाषा असल्याचा उल्लेख केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कमल गोविंदा ढाके यांना गाते जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षक पदावरून जि.प.सेवेतून निलंबित करीत असल्याचे आदेश ३१ आॅक्टोबर रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांनी पारीत केले आहेत. या निर्गमन उताऱ्याचा उपयोग जातपडताळणीसाठी केला जातो.याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील गाते जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या कमल गोविंदा ढाके या तांदलवाडी जि.प. केंद्रशाळेत प्रभारी मुख्याध्यापक पदावर यापूर्वी कार्यरत होत्या. त्या सेवा कालावधीत त्यांनी तांदलवाडी माध्यमिक शाळा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व विश्वस्त श्रीराम भिका पाटील, जीवराम कृष्णा पाटील, बाबू काशिनाथ पाटील, मुकेश दशरथ पाटील, केशव गोविंदा महाजन व माजी आमदार राजाराम गणू महाजन, भागवत गेडू महाजन या सात सदस्यांना मोठा घोटाळा करून गुजर मातृभाषा असल्याचा बेकायदेशीर उल्लेख करून शाळा निर्गमनाचा दाखला दिल्याने त्यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी तक्रार बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसदेचे जिल्हाध्यक्ष शुद्धोधन लालचंद सोनवणे यांनी जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती.त्यानुसार गटशिक्षणाधिकारी व्ही.एस.पवार यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात तालुक्यात गुजर वा गुजराती माध्यमाच्या प्राथमिक शाळा अस्तित्वात नसताना वा संबंधितांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यासह नमुना नंबर एकवर कुठेही गुजर मातृभाषा असल्याचा उल्लेख नव्हता. असे असताना तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापिका कमल गोविंदा ढाके यांनी शाळा निर्गमन उताºयातील रकाना नंबर ६ मध्ये मराठीऐवजी गुजर मातृभाषेचा उल्लेख करून सदरचा निर्गमन दाखला दिला असल्याचे नमूद केले आहे. किंबहुना त्यांचे हे वर्तन शिस्तभंग करणारे, असभ्य, अशोभनीय व कर्तव्यात कसूर करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे.त्या अनुषंगाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांनी गाते जि.प. शाळेतील उपशिक्षिका कमल गोविंदा ढाके यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हासेवा (वर्तणक) नियम १९६७ मधील ३ चा भंग करून गैरशिस्तीचे वर्तन व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना जि.प. सेवेतील प्राथमिक उपशिक्षक पदावरून निलंबित करीत असल्याचे आदेश पारीत केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर