शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री दुचाकी चोरून नेणाऱ्या तरुणाला रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:21 IST

जळगाव : गणपतीनगरातील रहिवासी सचिन प्रीतमदार जेठवाणी यांची घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेत असलेल्या चोरट्याला गुरुवारी मध्यरात्री २ वाजता ...

जळगाव : गणपतीनगरातील रहिवासी सचिन प्रीतमदार जेठवाणी यांची घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेत असलेल्या चोरट्याला गुरुवारी मध्यरात्री २ वाजता रामानंदनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. चोरट्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली असून या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपतीनगरातील सचिन जेठवाणी हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे एमएच १९ डीसी ५७११ क्रमांकाची मोपेड दुचाकी असून ती त्यांनी आपल्या घराच्या समोर उभी केली होती. दरम्यान, २६ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्यांना अचानक जाग आली व ते घराबाहेर आले. तेव्हा त्यांना अंगणात लावलेली दुचाकी दिसून आली नाही. नंतर रस्त्यावर येऊन दुचाकीचा शोध घेत असताना एक चोरटा त्यांची दुचाकी ढकलत नेत असल्याचे त्यांना दिसले. जेठवाणी यांनी चोर-चोर असे ओरडत असतानाच त्याचवेळी रात्री गस्तीवर असलेले रामानंदनगर पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्याला रंगेहाथ अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव राहुल गणेश महाजन (२०, रा. टिपू सुलतान चौक तांबापुरा) असे सांगितले. त्यानंतर जेठवाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.