शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त एलईडीची माहिती मिळणार बसल्याजागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST

शहरात बसविण्यात आले १७ हजार एलईडी : तब्बल दोन वर्षांनंतर झाले काम पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात ...

शहरात बसविण्यात आले १७ हजार एलईडी : तब्बल दोन वर्षांनंतर झाले काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात ईएसएल कंपनीच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यात एकूण १७ हजार ४०० एलईडीचे पथदिवे बसविण्यात आले आहेत. हे एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असले तरी, एलईडी पुन्हा बंद होणार नाही किंवा बंद पडल्यास तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी संबंधित कंपनीकडून शहरातील १२५ ठिकाणी सेंट्रल मॉनेटरिंग ऑपरेटिंग सिस्टिम बसविण्यात आली असून, शहरातील कोणत्याही भागात एलईडी बंद पडला तरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बसल्या जागी याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी देखभाल-दुरुस्तीच्या कामात सातत्य राहणार आहे.

शहरात गेल्या दोन वर्षांपूर्वी मनपाकडून एस्को तत्त्वावर सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून ईएसएल या कंपनीला सात वर्षांसाठी शहरात १५ हजार ६०० एलईडी लावण्याचा ठेका देण्यात आला होता. मात्र, संबंधित ठेकेदाराने कोणताही डीपीआर सादर न करताच हे काम सुरू केल्याने व कामात देखील गुणवत्ता नसल्याने अनेक नगरसेवकांकडून याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच हा ठेका रद्द करण्याची मागणी केल्यानंतर हा ठेका रद्द करण्याचा ठराव देखील महापालिकेत करण्यात आला होता. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे या ठेकेदाराला नवीन डीपीआर तयार करून नव्याने काम सुरू करण्याचा सूचना मनपाने दिल्यानंतर तीन महिन्यात ठेकेदाराने शहरात मुख्य भागासह विविध कॉलनी भागात तब्बल १७ हजार ४०० एलईडी नव्याने बसविले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून महापौर जयश्री महाजन यांनी देखील याबाबतचा आढावा घेऊन, हे काम पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम्‌ दिला होता. या अल्टिमेटम्‌नंतर हे काम पूर्ण झाले आहे.

१२५ ठिकाणी काम करणार सिस्टिम

पहिल्या टप्प्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसात एलईडी दिवे बंद पडण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीनंतर दुसऱ्या टप्प्यात संबंधित ठेकेदाराने सेंट्रल मॉनेटरिंग ऑपरेटिंग सिस्टिम कार्यान्वित केली आहे. त्यानुसार १२५ ठिकाणी ही सिस्टिम बसविण्यात आली असून, यामुळे कोणत्या भागात किती दिवे बंद आहेत याची माहिती कळेल. तसेच एकाचवेळी पथदिवे सुरू व बंद करणे सोपे होणार आहे.

दरम्यान, ईएसएल कंपनीने एलईडी लावण्याचे काम पूर्ण केले असले तरी पुढील सात वर्षांपर्यंत या कंपनीमार्फत योजनेचे देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. मनपाने काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर योजनेसाठी झालेला खर्च व देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारी फी याबाबत खर्चाचा आढावा सादर केला जाणार आहे.