नऊ लाखांचा अपहार करणारा येवतीचा सरपंच अटकेत

By Admin | Updated: April 9, 2017 11:39 IST2017-04-09T11:39:01+5:302017-04-09T11:39:01+5:30

बोदवड तालुक्यातील येवती येथील अपहार प्रकरणी फरार सरपंच पुरुषोत्तम पाटील यांना अटक करण्यात आली.

Yavaty's sarpanch detained for nine lakhs | नऊ लाखांचा अपहार करणारा येवतीचा सरपंच अटकेत

नऊ लाखांचा अपहार करणारा येवतीचा सरपंच अटकेत

 बोदवड,दि.9- तालुक्यातील येवती येथील अपहार प्रकरणी फरार सरपंच पुरुषोत्तम पाटील यांना अटक करण्यात आली.

माजी सरपंच व विद्यमान सरपंचासह दोन ग्रामसेवकावर भारत निर्माणच्या योजनेत सुमारे नऊ लाख 26 हजार 85 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा 16 रोजी दाखल करण्यात आला होता तर त्या दिवसापासून आरोपी फरार होते व अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न ही सुरू होते 30 मार्च रोजी न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्याने आरोपी फरार होते. बोदवड पोलिसांना आज दुपारी गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी येवती गावात पथकासह पाहणी करत विद्यमान सरपंच पुरूषोत्तम पाटील यांना अटक केली व बोदवड पोलीस ठाण्यात आणले. (वार्ताहर)

Web Title: Yavaty's sarpanch detained for nine lakhs