शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पं.स.सभापतीपदी यमुनाबाई रोटे, उपसभापतीपदी शीतल पाटील

By admin | Updated: March 15, 2017 00:40 IST

सेना-भाजपाच्या नेत्यांचा अबोला : आरक्षणामुळे सेनेचे बहुमत असताना सभापतीपद भाजपाकडे

जळगाव : पंचायत समितीच्या सभापतीपदी नशिराबाद गणातील भाजपाच्या सदस्या यमुनाबाई रोटे तर उपसभापतीपदी शिवसेनला समर्थन दिलेल्या भोकर गणातील सदस्या शीतल कमलाकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. पं.स.मध्ये  पाच सदस्यांसह व दोन अपक्षांची साथ असल्याने शिवसेना बहुमतात आहे. पण  सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गातून फक्त भाजपाच्या यमुनाबाई रोटे या निवडून आलेल्या आहे. त्यामुळे नियमानुसार रोटे यांना या पदाची संधी भाजपाचे बहुमत नसताना मिळाली. मंगळवारी याबाबतची प्रक्रिया पं.स.च्या सभागृहामध्ये पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी जलज शर्मा होते. सकाळी 11ते 1 यादरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती. त्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आला. सभापती व उपसभापती या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे यमुनाबाई व शीतल पाटील यांचेच अर्ज प्राप्त झाले. इतर कुणाचेही अर्ज न आल्याने निवड बिनविरोध झाली. नशिराबाद येथे जल्लोषआमचा नशिराबाद येथील वार्ताहर कळवितो की, पंचायत समितीचे सभापतीपद नशिराबाद गणातील भाजपच्या उमेदवार यमुनाबाई रोटे यांना मिळाल्याने विजयी रॅली काढून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला़ नूतन सभापती यमुनाबाई रोटे यांनी भवानीमातेचे दर्शन घेतल़े तसेच बौध्द विहारात जाऊन तेथे नतमस्तक होऊन गणातील विकासकामांचा संकल्प केला़ बसस्थानकापासून रॅलीला सुरुवात झाली़  जि़प़सदस्य लालचंद पाटील, पंचायत समिती सदस्या जागृती चौधरी, योगेश पाटील हे उपस्थित होत़े ठिकठिकाणी सभापतींचे औक्षण तसेच स्वागत करण्यात आल़े माजी खासदार वाय़जी़महाजन यांची भेट घेऊन रोटे यांनी आशीर्वाद घेतल़े ग्रा़पं़सदस्य अनिल पाटील, मोहन येवले, राजू रोटे, रवींद्र पाचपांडे, सचिन महाजन उपस्थित होत़ेगवळे यांच्या याचिकेवर  2 एप्रिल रोजी कामकाजसभापतीपदी विराजमान झालेल्या यमुनाबाई दगडू रोटे यांची पं.स.सदस्यपदी झालेली निवड ही अयोग्य असल्याबाबतची याचिका रोटे यांच्याविरुद्ध नशिराबाद गणात पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नथाबाई गवळे रा.कंडारी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय व औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपिठात दाखल केली आहे. रोटे या अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गणातून यमुनाबाई रोटे या नावाने निवडून लढवून विजयी झाल्या, पण त्यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र हे यमुनाबाई गायकवाड असे आहे. 2010 च्या नशिराबाद ग्रा.पं. निवडणुकीत यमुनाबाई रोटे यांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव जागेवर निवडणूक लढविताना रोटे यांनी आपली जात नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून नमूद केली, असे मुद्दे गवळे यांनी याचिकेत मांडले आहेत. या याचिकेवर जिल्हा न्यायालयात 2 एप्रिल रोजी कामकाज आहे. निवडीनंतर अभिनंदनदोघांच्या निवडीनंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे हे पं.स.मध्ये नवीन पदाधिका:यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. गुलाबराव पाटील यांनी पं.स.सभापती दालनात जाऊन उपसभापती शीतल पाटील यांचे अभिनंदन केले. नेते एकत्र मात्र..सेना व भाजपाचे नेते पं.स.च्या आवारात एकत्र आले, पण कुठलाही संवाद या नेत्यांमध्ये झाला नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव यांनी मात्र सभापती रोटे यांना पुष्पगुच्छ दिला. थोडय़ा वेळानंतर भाजपा व सेनेचे पदाधिकारी पं.स.मधून निघून गेले. कामाची अपेक्षानिवडीनंतर प्रांत जलज शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आदिवासी योजनांच्या कामांबाबत फारशी प्रगती दिसून येत नाही. पण नव्या पदाधिकारी, सदस्य यांनी आदिवासी बांधवांसह इतरांसाठीच्या योजनांवर लक्ष देऊन काम करायला हवे.