जळगाव तालुक्यतील 11 ग्रामपंचायतपैकी सात गावांचा कारभार महिलांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:29 PM2017-12-27T13:29:31+5:302017-12-27T13:29:46+5:30

ग्रामपंचायत निकाल

Women in the hands of seven villages in 11 Gram Panchayats | जळगाव तालुक्यतील 11 ग्रामपंचायतपैकी सात गावांचा कारभार महिलांच्या हाती

जळगाव तालुक्यतील 11 ग्रामपंचायतपैकी सात गावांचा कारभार महिलांच्या हाती

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27-  जळगाव तालुक्यातील 11 ग्रा.पं. निवडणुकांचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून यामध्ये 11 पैकी सात गावांचा कारभार महिलांच्या हाती आला आहे. 11 पैकी पळसोद ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध ठरली असून बुधवारी उर्वरित 10 गावांची मतमोजणी करण्यात आली. 
हाती आलेल्या निकालानुसार, निमगाव बु. येथे प्रियंका रवींद्र पाटील या सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या असून धामणगाव येथे रंजना महेंद्रकुमार मंडोरे, खेडी - माधुरी कैलास चौधरी, लोणवाडी - नकुलाबाई भिमसिंग भील, जामोद - उषाबाई मधुकर पाटील, बिलवाडी - सुलभाबाई मदन पाटील या विजयी ठरल्या असून पळसोद येथे सरपंदपदी यापूर्वीच राधाबाई पंकज पाटील यांची बिनवरोध निवड झाली आहे. या सातही गावांचा कारभार महिलांच्या हाती आला आहे. या सोबतच डोमगाव सरपंचपदी हिलाल श्रावण राठोड, पाथरी - शिरीष रामराव जाधव, विटनेर - चावदास सदाशिव कोळी, सुभाषवाडी - राजाराम धिंगा चव्हाण हे निवडून आले आहेत. 
मतमोजणी ठिकाणी मोठी गर्दी होऊन विजयी उमेदवार व कार्यकत्र्याचा मोठा जल्लोष होता. 

Web Title: Women in the hands of seven villages in 11 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.