पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोन्याची पोत लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST2021-08-27T04:20:30+5:302021-08-27T04:20:30+5:30

जळगाव : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने प्रतिमा विवेक काटदरे यांच्या गळ्यातून पन्नास हजार रूपये किमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली. ...

The woman's gold texture was lengthened under the pretext of asking for an address | पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोन्याची पोत लांबविली

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोन्याची पोत लांबविली

जळगाव : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने प्रतिमा विवेक काटदरे यांच्या गळ्यातून पन्नास हजार रूपये किमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली. ही घटना बुधवारी सायंकाळी ६़ १५ वाजताच्या सुमारास प्रेमनगर भागातील बेंडाळे नगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेंडाळे नगरात प्रतिमा काटदरे या पती व मुलासह वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी त्या दूध घेण्यासाठी घराबाहेर पडल्या. सायंकाळी ६.१५ वाजता दूध घेऊन आल्यानंतर त्या घराच्या गेटजवळ उभ्या होत्या. तेवढ्यात एका दुचाकीवरून दोन युवक त्यांच्याजवळ आले व आनंदभय्या देवरे कुठे राहतात, असे विचारून काटदरे यांना पत्ता लिहिलेली चिठ्ठी दिली. काटदरे या चिठ्ठी वाचत असताना अचानक दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढली व दुचाकीवरील दोघांनी तेथून पळ काढला. महिलेले आरडा-ओरड केली; मात्र चोरटे पोत घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. त्यानंतर प्रतिमा यांनी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The woman's gold texture was lengthened under the pretext of asking for an address