शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी पतीकडून पत्नीची हत्या

By admin | Updated: March 14, 2017 16:39 IST

दारुच्या नशेत असलेल्या पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने पत्नीच्या दोन्ही पायावर व गुप्तांगावर चेहऱ्यावर जबर मारहाण केल्याने

ऑनलाइन लोकमतभूसावळ, दि. 14 - दारुच्या नशेत असलेल्या पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने पत्नीच्या दोन्ही पायावर व गुप्तांगावर चेहऱ्यावर जबर मारहाण केल्याने त्यात ती मयत झाल्याची घटना १३ रोजीच्या मध्यरात्री हिंगोणाख ता.यावल येथील किशोर वारके यांच्या शेतातील झोपडीत घडली. दुधीबाई जवानसिंग बारेला (वय ५०) असे मयत महिलेचे नाव असून पोलिसांनी आरोपी पती जवानसिंग नारसिंग बारेला यास अटक केली आहे़ त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोणा येथील किशोर वारके यांच्या शेतात राहत असलेले जवानसिंग व दुधीबाई बारेला हे पावरा पती-पत्नीने १३ रोजी मद्य प्राशन केले होते़ मद्याच्या नशेत या दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाले. या वादामध्येच जवानसिंग याने पत्नी दुधीबाई हिस लाकडी दांडक्याने व रबरी पट्ट्याने दोन्ही पायाच्या गुडघ्यांवर व गुप्तांगावर तसेच चेहऱ्यावर जबर मारहाण केली व त्यातच दुधीबाईचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. याप्र्रकरणी हिंगोणा पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी तक्रार दिल्यावरून जवानसिंग बारेला याच्याविरुद्ध भादंवि ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जवानसिंग यास अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी डीवायएसपी अशोक थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी भेट दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहेते व सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)