सत्ता स्थापनेसह प्रत्येकवेळी शिवसेनेच भाजपचे का ऐकावे - शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:38 PM2019-11-02T12:38:04+5:302019-11-02T12:38:44+5:30

‘लोकमत’ भेटीदरम्यान भाजपच्या भूमिकेविषयी उपस्थित केला प्रश्न

Why should Shiv Sena listen to BJP every time with establishment of power - Shiv Sena Deputy Gulabrao Patil | सत्ता स्थापनेसह प्रत्येकवेळी शिवसेनेच भाजपचे का ऐकावे - शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील

सत्ता स्थापनेसह प्रत्येकवेळी शिवसेनेच भाजपचे का ऐकावे - शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील

Next

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी युती करताना जागा वाटपाचा प्रश्न असो की निवडणुकीदरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडखोरी आणि आता सत्ता स्थापनेतही भाजपचा आग्रह योग्य नाही. प्रत्येक वेळी शिवसेनेच भाजपचे का ऐकावे, असा प्रश्न सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी जळगावात ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या भेटीप्रसंगी उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून विजयी झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीच्या मुद्यावर परखड मत व्यक्त करीत प्रत्येक बाबतीतील भाजपच्या भूमिकेविषयी व इतर मुद्यांवर आक्रमकपणे भाष्य केले. या वेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद....
प्रश्न - युती होऊनही बंडखोरी झाली, भाजपच्या या भूमिकेविषयी काय वाटते ?
उत्तर - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती होण्यादरम्यान भाजपने जादा जागांचा आग्रह केला. ते शिवसेनेने मान्य केले. मात्र त्यानंतर युती होऊनही भाजपच्या पदाधिकाºयांनी माझ्यासह शिवसेनेचे ज्या मतदार संघात उमेदवार होते तेथे बंडखोरी केली. राज्याचे नेते असलेले गिरीश महाजन असो की भाजपचे इतर नेते बंडखोरांना थांबवू शकले नाही. तरीदेखील आपण विजय मिळविला. मात्र भाजपच्या या भूमिकेमुळे राज्यात युतीच्या १६ ते १७ जागा गेल्या. याला कोणाला जबाबदार धरावे. आता सत्ता स्थापनेतही भाजपचा आग्रह योग्य नाही. आम्ही मतलबासाठी युती करीत नाही. ज्या मुद्यावर युती झाली, त्याची धार आम्ही सोडलेली नाही. त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे.
प्रश्न - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी सत्ता स्थापनेचा तिढा का सुटत नाही?
उत्तर - सत्तेची गरज भाजपला आहे. मात्र प्रत्यक्षात सत्ता हे साधन आहे साध्य नाही, कोणी सत्तेसाठी जन्माला आलेले नाही. जे काही होणार आहे, ते शिवसेनेमुळेच होईल. शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळे आम्ही त्यात राहूच. दुसरीकडे शिवसेनेसमोर विरोधक पर्याय ठेवतच आहे. त्यामुळे शिवसेनेशिवाय काही होऊ शकत नाही. प्रत्येक पक्षप्रमुख पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील तेच करीत आहे, त्यात गैर काहीच नाही.
प्रश्न - जि.प.मघ्ये सत्ता स्थापनेत शिवसेनेला स्थान दिले नाही, त्याचा या ेवेळी भाजपला फटका बसला का?
प्रश्न - जि.प.मघ्ये सत्ता स्थापनेत शिवसेनेला स्थान दिले नाही, त्याचा या ेवेळी भाजपला फटका बसला का?
उत्तर - मुळात भाजपच्या अशा भूमिकेविषयी त्यांच्याच बºयाच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे रावेर मतदार संघात भाजपला फटका बसून हरिभाऊ जावळे यांच्या सारखा चांगला माणूस पराभूत झाला. भाजपला त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. मात्र आमचे कार्यकर्त्यांवर नियंत्रण आहे.
प्रश्न - भाजपला अतिविश्वास नडला का?
उत्तर - लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने मिळविलेल्या विजयाची हवा डोक्यात होतीच. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बोहनीची सभा जळगावात असा होणारा प्रचार, बंडखोरीला आलेला ऊत व गळ््यात पक्षाचाच गमचा घालून प्रचार करणाºया बंडखोरांकडे दुर्लक्ष करणे, असा कोणता पक्ष आहे का?. हे सर्व मुद्दे भाजपला धोकादायक ठरले. लोकसभा निवडणुकीवेळी युती झाल्याने आम्ही भर उन्हात ४७ अंशावर पारा असताना मोदी-मोदी करीत फिरलो. आणि आता त्यांनी काय केले. हे सर्व प्रकार योग्य नसल्यानेच ही वेळ आली.
प्रश्न - गिरीश महाजन व आपले चांगले संबंध असतानाही पंतप्रधानांच्या सभेप्रसंगी वाद का उफाळला?
उत्तर - गिरीश महाजन यांच्याशी आजही चांगले संबंध आहे व राहतील. मात्र ते राज्याचे नेते असताना त्यांनी बंडखोरांना समजविले नाही. बंडखोरी करणाºयांपैकी त्यांनी एकालाही पक्षातून काढले नाही. आम्ही मात्र बंडखोरांची हकालपट्टी केली. गिरीश महाजन यांना या विषयी १० वेळा सांगून पाहिले तरी उपयोग झाला. त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे त्यांना या विषयी बोलावे लागले. त्यांनी बंडखोरांना आवरले असते तर आम्ही झोपलो असतो तरी निवडून आलो असतो.
प्रश्न - युतीमध्येच लढत असल्याचे चित्र होते का?
उत्तर - सत्तेच्या हवासापोटी भाजप राज्यात १२२ जागादेखील राखू शकला नाही. राज्यात सर्वत्र भाजपकडून बंडखोरी झाल्याने त्याचा फटका त्यांना बसलाच. मात्र भाजपचे जे खरे कार्यकर्ते होते त्यांनी काम केले. जळगाव ग्रामीण मतदार संघातही भाजपच्या खºया कार्यकर्त्यांनी काम केलेच.
प्रश्न - आपले कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेना सोडून गेले, त्याबाबत काय सांगाल?
प्रश्न - आपले कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेना सोडून गेले, त्याबाबत काय सांगाल?
उत्तर - सोडून जाणे वाईटच आहे. मात्र ‘विनाश काले विपरीत बुद्धी’सारखा हा प्रकार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली, त्या वेळी माझ्याही मनात पाल चुकचुकली होती. मात्र शिवसेना पक्ष मोठा आहे, त्यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे. बाळासाहेबांकडे जळकेकर महाराज यांचा सत्कार केला होता, बाजार समितीमध्येही त्यांचे नाव दिले. जानकीराम पाटील यांनाही पदे दिले. मात्र जे गेले व जेथे गेले तेथे सुखी राहोत.
प्रश्न - जाती-पातीचे समीकरण जोडले गेले तरी आपण विजय मिळविला, हे कसे शक्य झाले?
उत्तर - गुलाबराव देवकर निवडणुकीत असते तर निवडणूक थोडी कसरतीची झाली असती. मात्र विजय तर निश्चित होता. निवडणुकीदरम्यान बंडखोरांनी अफवा पसरविल्या. सोबतच जाती-पातीचे राजकारण झाले तरी माझा माझ्या मतदारांवर विश्वास होता. त्यामुळे विजय शक्य झाला.
प्रश्न - कॅबिनेट मंत्रीपद मिळेल का?
उत्तर - वाटते तर आहे. ज्येष्ठतेनुसार ते मिळू शकते. मात्र पक्षाचा निर्णय मान्य राहील.

बळीराजाला सावरण्यासाठी हात देणार
आगामी पाच वर्षांचे करायचे कामे ठरले असले तरी सर्वात प्रथम सध्या अति पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीमधून बळीराजाला सावरण्यासाठी मदत हात देणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. सोबतच दुष्काळी अनुदानाचा निधी अद्यापही ज्यांना मिळालेला नाही, त्यांना त्याचा लाभ मिळवून देणार आहे. याखेरीज सूतगिरणीचा प्रश्न मार्गी लावणे, धरणगावला औद्योगिक वसाहत उभारणे, शेतीसाठी रस्ते व सिंचनासाठी जलयुक्तच्या कामांना प्राधान्य राहणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Why should Shiv Sena listen to BJP every time with establishment of power - Shiv Sena Deputy Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.