शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाध्याय’ची सक्ती कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटीई २००९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटीई २००९ नुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र अद्याप ही स्वाध्याय सक्तीचा केला असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांची तारांबळ उडत आहे. स्वाध्याय सक्तीचा करण्‍यात येऊ नये, अशी मागणी काही पालकांकडून होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. यातील जे विद्यार्थी ऑनलाइन होते त्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि जे ऑफलाइन होते किंवा ज्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्याच नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आरटीई २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. एवढेच नाही तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही थोड्याफार प्रमाणात मूल्यमापन करून सरसकट उत्तीर्णतेचा निर्णय घेण्यात आला. तसेच दहावीची परीक्षा रद्द करून बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. असे असताना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेला स्वाध्याय हा उपक्रम मात्र अद्यापही सुरूच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवण्याची सक्ती शिक्षकांवर केली जात आहे. विद्यार्थी त्यांच्या घरी असताना शिक्षक हा स्वाध्याय त्यांच्याकडून कसा सोडवून घेणार? त्यासाठी शिक्षकाला आपला जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागेल. कारण ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. सरसकट उत्तीर्णतेचा निर्णय घेतल्यावर आता स्वाध्यायाची सक्ती कशाला? असा प्रतिप्रश्नही पालक व विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. यावर शिक्षणाधिकारी यांच्या संपर्क साधला असता, तो झाला नाही. जळगाव जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात ६ लाख २१ हजार ९४६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २ लाख ७३ हजार विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेतात. इतर विद्यार्थ्यांचा सहभाग नसतो. त्यामुळे काही तज्ज्ञ शिक्षकांनी सुद्धा स्वाध्याय सक्तीचे न करण्‍याची प्रतिक्रिया दिली आहे.