शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू नववर्षाचे जळगाव व अमळनेरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 12:25 IST

मराठी नववर्षाचे जळगाव व अमळनेर शहरात मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्त प्रमुख चौकांमध्ये रांगोळ्या तसेच शोभायात्रा काढण्यात आली.

 जळगाव/अमळनेर, दि.28- मराठी  नववर्षाचे जळगाव व अमळनेर शहरात मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्त प्रमुख चौकांमध्ये रांगोळ्या तसेच शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी घरोघरी गुढय़ा उभारण्यात आल्या. जळगाव शहरातील ग्राम दैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे जुने जळगावात गावगुढी उभारण्यात आली. 

जळगावात शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
हिंदू नववर्षानिमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्तगणांतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत विद्यार्थीनींचे लेझीम पथक, कलशधारी महिला, भजनी मंडळ सहभागी झाले. शोभायात्रेत भक्तगणांतर्फे प्रभू रामचंद्र व शबरीमाता भेट, पंढरपूरचे विठोबा रुख्मिणी, संत गजानन महाराज, साई बाबा यांचा सजीव आरास सादर करण्यात आला. त्या पाठोपाठ कन्या भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, अंधश्रद्धा निमरूलन, पाणी बचत या विषयांची जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी झाले होते.
अमळनेरमध्ये आकर्षक शोभायात्रा
अमळनेरच्या ओम नारायण इंडस्ट्रिजच्या (प्रताप मील) आवारातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. यात्रेच्या अग्रभागी हातगाडीवर मोठी गुढी होती. त्यापाठोपाठ घोडेस्वार,उंटस्वार होते. त्याच्या मागे गायत्री परिवाराची पालखी होती. स्वामी नारायण परिवार,संत सखाराम महाराज वारकरी मंडळ, आदी शोभायात्रेत सहभागी झाले होते. भगवेध्वज, ढोल ताशांवर थिरकणारी तरुणाई स्वागत यात्रेचे प्रमुख आकर्षण होती. भारत मातेच्या जयघोषाने शहर दणाणले होते.