शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'टॉप १00' थकबाकीदारांवर 'वॉच'

By admin | Updated: November 3, 2014 15:24 IST

प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांना दिले आहेत.

जळगाव : महावितरण कंपनीच्या जळगाव परिमंडल कार्यालयांतर्गत धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे एकूण १ हजार ९२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता महावितरण कंपनीने कंबर कसली आहे. प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांना दिले आहेत. नियमित वीज बिले जमा करा, असे आवाहन अनेकदा करूनही आपले कोण काय करणार? अशा 'तोर्‍यात' राहणार्‍या वीज ग्राहकांची संख्या खान्देशात कमी नाही. वारंवार वीज ग्राहकांना आवाहन करूनदेखील त्याकडे वीज ग्राहक दुर्लक्ष करतात. त्यामुळे महावितरण कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ४७ उपकेंद्रांतील अधिकार्‍यांना सूचना वीज बिलांची वसुली करण्यासाठी महावितरण कंपनीने धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील ४७ उपकेंद्रांतील अधिकार्‍यांना परिमंडल कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्यातील तालुकानिहाय 'टॉप १00' थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली करावी. त्यांच्याकडून बिले जमा होत नसल्यास वीज कनेक्शन बंद करावे, अशा सूचना कंपनीने दिल्या आहेत.

कृषी संजीवनी योजनेने दिलासा खान्देशातील ग्रामीण भागातील नागरिकांनी कृषी संजीवनी योजनेंतर्गत बिले जमा केल्याने ९५ कोटी रुपयांचा महसूल महावितरण कंपनीला तीन महिन्यात मिळाला आहे. मात्र, घरगुती, औद्योगिक व वाणिज्य क्षेत्रातील ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली होत नसल्यामुळे वीज कनेक्शन काढून घेण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. 

२२६ फीडरवर भारनियमन सुरू वीज बिलांची वसुली झाली तर भारनियमन मुक्त करण्यात येईल, असे सांगण्यात आल्यानंतर खान्देशातील ३७२ फीडरपैकी १४६ फीडरवरील वीज ग्राहकांची वीज बिलांची वसुली झाल्यामुळे या फीडरवरील भारनियमन बंद करण्यात आले आहे. उर्वरित २२६ फीडरवरील ग्राहकांकडे वीज बिलांची रक्कम मोठय़ा प्रमाणात थकल्यामुळे या फीडरवरील भारनियमन अद्यापही सुरू आहे. 

वीजचोरी रोखण्याचे आवाहन विजेची गळती व मोठय़ा प्रमाणात होणारी वीजचोरी रोखण्याचे आवाहन महावितरण कंपनीसमोर आहे.  मात्र, थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज बिलांची वसुलीकडे महावितरण कंपनीचे लक्ष असल्यामुळे विजेची चोरी होताना दिसत आहे. 

१२00 कनेक्शन बंद महावितरण कंपनीच्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्‍या खान्देशातील १२00 थकबाकीदार वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने दिवाळीच्या काळात बंद केले आहेत. २0 टक्के लॉसेस्चे प्रमाण जळगाव परिमंडलअंतर्गत २0 टक्के विजेचे लॉसेस् आहेत. हे प्रमाण कमी करण्याआधी महावितरण कंपनीला वीजचोरीचे प्रमाण थांबवावे लागणार आहे. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज बिल वसुलीकडे प्रामुख्याने लक्ष देत असल्यामुळे वीजचोरी व विजेच्या गळतीचे प्रमाण खान्देशात 'जैसे थे' आहे. वीजचोरीचे वाढते प्रमाण, वीज ग्राहकांकडे असणारी वीज बिलांची थकबाकी यामुळे खान्देशात भारनियमन सुरू आहे.