विनापरवाना औषधी गोळ्यांचा साठा दुकानमालकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा

By संजय पाटील | Published: July 26, 2023 05:27 PM2023-07-26T17:27:16+5:302023-07-26T17:27:50+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागाने ही धडक कारवाई केली.

Unlicensed stocking of medicinal pills crime registered against shopkeeper and two persons | विनापरवाना औषधी गोळ्यांचा साठा दुकानमालकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा

विनापरवाना औषधी गोळ्यांचा साठा दुकानमालकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

अमळनेर : नशा अथवा गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व औषधी विनापरवाना बाळगणारा औषधी दुकानदार व विक्री प्रतिनिधी अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही धडक कारवाई केली.

अमळनेर शहरातील नगरपालिका व्यापारी संकुलात सूरज अधिकार पाटील (२६) यांचे राजमुद्रा मेडिकल हे दुकान आहे. यात ५ एप्रिल २०२३ ते ११ जुलै २०२३ दरम्यान मोठ्या प्रमाणावर नशा येणारा औषधीसाठा असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले.

कोडिन सिरप ५५९ बाटल्या, ट्रॅमाडीन १०० इंजेक्शन, निट्रोसून ४५३० गोळ्या खरेदी केल्या असल्याचे दिसून आले. अन्न व औषध निरीक्षक सोमनाथ मुळे, सहआयुक्त अनिल माणिकराव, औषध निरीक्षक गजानन धिरके यांनी १९ जुलै रोजी सकाळी या मेडिकलवर छापा टाकला. त्यात अल्प्रासेफ नावाच्या २२० गोळ्या आढळल्या. गोळ्या नशेसाठी वापरण्यात येतात. या गोळ्यांना नशा करणाऱ्यांमध्ये कुत्ता’ गोळ्या म्हणून ओळखल्या जातात.

दुकानदाराने गोळ्यांची विक्री अथवा वापराबाबत काहीच पुरावे दिले नाहीत. या गोळ्या त्याने विक्री प्रतिनिधीकडून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे या गोळ्या अवैधरीत्या गर्भपातासाठी वापरण्यात आल्या असाव्यात. सोमनाथ मुळे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात दुकान मालक सूरज पाटील आणि विक्री प्रतिनिधी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे व हेकॉ. सुनील हटकर करीत आहेत.
 

Web Title: Unlicensed stocking of medicinal pills crime registered against shopkeeper and two persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.