शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीने मिळाला विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:15 IST

एरंडोल : चिमणरावांनी मिळविली भाजपचीही साथ

एरंडोल : यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसह भाजप व मित्रपक्षांच्या पदाधिका-यांनी तसेच नेते मंडळींनी एक दिलाने काम केल्यामुळेच शिवसेनेचे उमेदवार चिमणराव पाटील यांना मोठ्या फरकाने विजय संपादन करणे शक्य झाले.मतदारसंघात नेहमीच भाजप-सेनेमध्ये तू तू मै मै पाहायला मिळते. मात्र यावेळी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीत यश कसे मिळेल, यासाठीच कंबर कसली होती. म्हणूनच राष्ट्रवादीचे मावळते आमदार डॉ.सतीष पाटील यांचा पराभव झाला असावा. चिमणराव पाटील यांची ओळख आजही सर्वसमावेशक, सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन चालणारा व सहकार क्षेत्रातील जाणकार नेता अशी आहे. कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसतानादेखील त्यांनी स्वत:च्या संघटन कौशल्यामुळे व बेरकी राजकारणामुळे युवा अवस्थेपासूनच राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला. मागील वेळी पराभूत झाल्यावरदेखील त्यांनी सातत्याने मतदारसंघातील मतदारांशी संपर्क वाढवून त्यांच्या सुखदु:खात सहभाग नोंदविला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चाळीसगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना मतदारसंघातून मतांची मोठी आघाडी मिळवून दिली होती. याव्यतिरिक्त त्यांनी सदैव भाजप-सेनेची युती भक्कम कशी राहील यावर वेळोवेळी भर दिला. त्याचीच परिणती म्हणून आज मिळालेला विजय आहे, असे म्हणता येईल.मावळते आमदार डॉ.सतीष पाटील यांच्या पाच वर्षांतील कार्याचा लेखाजोखा कसा आहे, याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी मतदारांपुढे मांडले. तसेच विकासकामांबाबत डॉ.सतीष पाटील यांची कार्यशैली कशी उदासीन आहे हे जनतेला पटवून देण्यात चिमणराव यशस्वी ठरले.अपेक्षित वेळेपेक्षा दीड तास विलंबएरंडेल मतदारसंघाचा अंतिम निकाल हाती येण्याची वेळ दुपारी २ वाजेपयर्यंतची होती. मात्र याउलट परिस्थिती पाहायला मिळाली. दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी विजयी उमेदवाराला निकालाचे प्रमाणपत्र देण्यात आले.