दगडी दरवाजाबाबत पुन्हा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:13+5:302021-09-03T04:17:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : शहराची शान असलेल्या ऐतिहासिक दगडी दरवाजाच्या बुरुजाचा भाग पुन्हा पावसाने ढासळल्याने पुनर्निर्माण समितीने ...

Ultimatum again about the stone door | दगडी दरवाजाबाबत पुन्हा अल्टिमेटम

दगडी दरवाजाबाबत पुन्हा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहराची शान असलेल्या ऐतिहासिक दगडी दरवाजाच्या बुरुजाचा भाग पुन्हा पावसाने ढासळल्याने पुनर्निर्माण समितीने चार दिवसात पुन्हा वेगाने बांधकाम सुरू न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे केला आहे.

पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे २४ जुलै २०१९ रोजी उजव्या बाजुचा बुरुज ढासळला. त्या दिवसापासून ते आजतागायत जणू काही प्रशासन दगडी दरवाजा पडण्याचीच वाट पाहात आहे, अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे.

ऑगस्ट २०पासून कामाचे आदेश देऊन आजपर्यंत कामात कुठलीही विशेष प्रगती नाही. २ रोजी दगडी दरवाजा पुनर्निर्माण समितीने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत १ रोजी रात्री ९ वाजता काही भाग पुन्हा ढासळल्याच्या पार्श्वभूमीवर निवेदन देऊन चर्चा कोली. काम तत्काळ वेगाने सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदारास शक्य नसल्यामुळे काम संथगतीने सुरू आहे म्हणून ठेकेदार बदलून काम तत्काळ सुरू करावे, अशीदेखील मागणी करत येत्या ४ दिवसात काम वेगाने सुरू न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन समितीने दिले आहे.

निवेदनावर पंकज चौधरी, गोपी कासार, नावीद शेख, बाळासाहेब संदानशिव यांच्या सह्या आहेत. तत्काळ दखल घेऊन काम त्वरित सुरू होईल, असे आश्वासन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी समिती सदस्यांना दिले.

Web Title: Ultimatum again about the stone door