शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्मसिंचनाद्वारे खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी

By admin | Updated: April 7, 2017 19:11 IST

दोन ठिकाणी पशुधन विषारी पाणी प्यायल्याने दगावल्याच्या घटना घडल्या असून, सूक्ष्मसिंचनातून विद्राव्य खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी आल्याचा निष्कर्ष प्रशासनाचा आहे.

जळगाव : तापीकाठावरील चोपडा, मुक्ताईनगर, रावेर, यावल, जळगाव, अमळनेर भागात बागायती क्षेत्रात मेंढपाळ, काठेवाडी बांधव आपले पशुधन घेऊन दाखल झाले आहेत. अशात दोन ठिकाणी पशुधन विषारी पाणी प्यायल्याने दगावल्याच्या घटना घडल्या असून, सूक्ष्मसिंचनातून विद्राव्य खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी आल्याचा निष्कर्ष प्रशासनाचा आहे.अजंदे ता.रावेर येथे मागील आठवडय़ात 190 मेंढय़ा शेतानजीक डबक्यातील पाणी प्यायल्याने दगावल्या होत्या. या मेंढय़ाचा मृत्यू युरीयायुक्त पाण्यानेच झाल्याचा अहवाल जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. नाशिक येथील प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यातच अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथेही दुभत्या गायी दगावल्याचा प्रकार समोर आला असून, यासंदर्भातही शवविच्छेदन करून त्यासंबंधीचा अहवाल, नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने दिली. सूक्ष्मसिंचन (ड्रीप)द्वारे दिलेली खते पाण्याद्वारे डबक्याततापीकाठावर केळी बागा अधिक आहेत. शेतकरी मजूरटंचाईवर मात आणि तांत्रिक शेतीवर भर म्हणून आता थेट फर्टिलायझर टॅँक, व्हेंचुरीद्वारे विद्राव्य खते विरघळवून त्याचा सूक्ष्मसिंचन प्रणालीद्वारे (ड्रीप) केळीला पुरवठा करतात. अर्थातच संबंधित शेतातील पूर्ण जलवाहिनीत खतांचा अंश असतो. या जलवाहिनीतून, सूक्ष्मसिंचनाच्या नळ्य़ांमधून जे पाणी बाहेर पडते त्यातही या खतांचा अंश मोठय़ा प्रमाणात असतो. हे साचलेले पाणी कुठलीही व्यक्ती, पशुधन यांना पिण्यास अयोग्य व घातक आहे. अर्थात हेच पाणी प्यायल्याने अजंदे शिवारातील मेंढय़ा दगावल्या व मेंढपाळ बांधवांचे मोठे नुकसान  झाले. नैसर्गिक आपत्ती नसल्याने भरपाईचा प्रश्नपूर, वीज पडणे, वादळ, घर पडणे आदी घटनांमध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसानग्रस्त पशुधनमालकांना शासन भरपाई देते. जि.प.तर्फे तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला जातो, पण अजंदे किंवा अंतुर्ली येथील मेंढय़ा व गायी दगावल्याची घटना ही नैसर्गिक आपत्तीमध्ये नाही. त्यामुळे संबंधित घटनांमध्ये भरपाईचा कुठलाही प्रस्ताव नाही. फक्त पालकमंत्री, मंत्री स्तरावर या घटनांबाबत भरपाईचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनातर्फे मिळाली. मेंढपाळ, काठेवाडी बांधव मोठय़ा संख्येने तापीकाठ व इतर भागात आपल्या पशुधनासाठी आले आहेत. त्यांनी पशुधनाला पाणी पाजण्यासाठी नेताना  डबक्यातील पाणी पाजू नये. साचलेले डबके केळीच्या शेतातील ड्रीप, जलवाहनीमुळे निर्माण झाले का, हे पाहावे. -डॉ.पी.एस.इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.