जळगावात गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:52 IST2018-10-19T12:51:49+5:302018-10-19T12:52:28+5:30
कृउबासमोर अपघात

जळगावात गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
जळगाव : चारचाकी वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुशरीफ सत्तार खान (३०, रा. जुनी पोलीस कॉलनी) हे जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडला.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, अशराफ खान हे चारचाकी वाहनाच्या शो रुममध्ये कामाला असून नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी सकाळी दुचाकीने कामावर जात होते. त्यावेळी समोरून एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्या वेळी अशराफ खान यांनी दुचाकी डाव्या बाजूला घेतली व त्याच वेळी मागून येणाऱ्या गॅस टँकरने जोरदार धडक दिली. यात अशरफ यांच्या डोक्याला जबर मार लगून ते जागीच ठार झाले. अपघातानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.