भुसावळात गोळीबाराची घटना, दोन जण जखमी; पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 23:50 IST2023-04-14T23:49:28+5:302023-04-14T23:50:30+5:30
या वृत्ताला तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी दुजोरा दिला आहे.

भुसावळात गोळीबाराची घटना, दोन जण जखमी; पोलिसांकडून तपास सुरू
जळगाव : भुसावळ शहरातील साकरी फेकरी फाट्यानजीक झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. जखमींना गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्ताला तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे हे गोदावरी रुग्णालयात पोहचले होते. याबाबत तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी सांगितले की, या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, हा गोळीबार कुणी आणि कशामुळे झाला. याची माहिती मिळू शकली नाही.