शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बकऱ्या चोरणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

जळगाव : शिवाजीनगर व परिसरातून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. जुबेर भिकन ...

जळगाव : शिवाजीनगर व परिसरातून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. जुबेर भिकन शेख (वय २१, रा. गेंदालाल मिल) व गौरव जगन कोळी (वय २०,रा. शिवाजीनगर) अशी दोघांची नावे असून, त्यांच्याजवळ चोरलेल्या दोन बकऱ्या मिळून आलेल्या आहेत. दरम्यान, या दोघांनी मागील आठवड्यात अमळनेरातही एका जणाला मारहाण करून लुटल्याचा प्रकार उघड झाला आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शिवाजीनगर व परिसरातील धनाजी काळे आणि हमालवाडा येथून तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण १३ बकऱ्यांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. कानळदा रोडवरील धनाजी काळेनगरातून वाल्मीक प्रभाकर वाघ (वय ४०) व राजू गणपत चौरे यांच्या प्रत्येकी दोन अशा एकूण चार बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याचे ८ जुलै रोजी समोर आले आहे. ही घटना ताजी असताना पुन्हा शिवाजीनगरातील हमालवाडा येथून धर्मेंद्र अंकुश चौधरी यांच्या मालकीच्या ३, किशोर गणपत गायकवाड यांच्या मालकीची एक, सुलताबाई नामदेव लोहार यांच्या मालकीच्या दोन, अजय राजेंद्र जगताप यांच्या दोन व नंदा बापू शेळके यांच्या काही बकऱ्या चोरी गेल्या होत्या. या गुन्ह्यातील दोन संशयित हे अमळनेर शहरात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांना मिळाली. त्यानुसार अमलदार किशोर निकुंभ, रतन गिते, गणेश पाटील, प्रफुल्ल धांडे, विजय निकुंभ यांच्या पथकाला रवाना केले. पथकाने अमळनेरातून जुबेर शेख आणि गौरव कोळी यांना शनिवारी रात्री ताब्यात घेतले. तपास प्रफुल्ल धांडे करीत आहेत.