शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मित्रांवर काळाचा घाला; भरधाव कार दुचाकीवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू

By सागर दुबे | Published: December 05, 2022 8:56 PM

या तरूणांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव : आपआपली कामे आटोपून घराकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला भरधाव कारने समोरून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील मित्रांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शिरसोली गावाजवळील हनुमान मंदिराजवळ सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. रफिक हुसेन मेवाती (२३) व अरबाज जहांगीर मेवाती (२०, दोन्ही रा. राणीचे बांबरूड,ता. पाचोरा) असे मृत मित्रांचे नावे आहेत. या तरूणांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत होती.

राणीचे बांबरूड येथे रफिक मेवाती हा आई-वडील, तीन भाऊ व बहिणीसह वास्तव्यास होता. तो जळगाव शहरातील मास्टर कॉलनीमध्ये पेरू विक्री करायचा. नेहमीप्रमाणे सोमवारी सुध्दा रफिक मास्टर कॉलनीमध्ये पेरू विक्रीसाठी आला होता. दुसरीकडे त्याचा मित्र अरबाज याने दहा ते पंधरा दिवसांपूर्वी नवीन मिनी ट्रक खरेदी केला होता. त्यामुळे वाहनाच्या कामानिमित्त औरंगाबाद गेला होता. सायंकाळी तो जळगावात परतला. त्यानंतर रफिक आणि अरबाज हे एकाच दुचाकीने (एमएच.१९.सीएच.४३५९) घरी जाण्यासाठी निघाले.

सुसाट कार धडकली अन् दोघं जागीच ठार...शिरसोली गावाच्या काही अंतरावर असलेल्या हनुमान मंदिराजवळून रफिक, अरबाज हे जात असताना त्यांच्या दुचाकीला पाचो-याकडून शिरसोलीकडे भरधाव येणा-या कारने (एमएच.१९.बीजे.२१७५) समोरून धडकली दिली. अपघात एवढा भीषण होता की, रफिक, अरबाज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे कारचा पुढील भागाचा चुराडा झाला होता. तर दुचाकीच्या पुढील भागाचे देखील नुकसान झाले होते.ग्रामस्थांसह पोलिसांची घटनास्थळी धाव...शिरसोली गावाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरसोली ग्रामस्थांसह एमआयडीसी पोलिस ठाण्यातील जितेंद्र राठोड, समाधान टहाकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर रूग्णवाहिका बोलवून तत्काळ रफिक आणि अरबाज यांना जिल्हा रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातDeathमृत्यू