आईजवळ झोपलेली असताना दोघांनी केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:35+5:302021-02-05T05:57:35+5:30

जळगाव : एका धार्मिक स्थळानजीकच्या जागेत आईच्या कुशीत झोपलेल्या १७ वर्षीय मुलीवर मध्यरात्री दोघांनी अत्याचार केला व त्यातून ही ...

The two committed atrocities while sleeping near the mother | आईजवळ झोपलेली असताना दोघांनी केला अत्याचार

आईजवळ झोपलेली असताना दोघांनी केला अत्याचार

जळगाव : एका धार्मिक स्थळानजीकच्या जागेत आईच्या कुशीत झोपलेल्या १७ वर्षीय मुलीवर मध्यरात्री दोघांनी अत्याचार केला व त्यातून ही मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चाळीसगाव शहरात घडलेला हा प्रकार जळगाव शहरातील बालसुधारगृहात उघडकीस आला असून पीडितेच्या जबाबावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध चाळीसगाव पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जिल्हा पेठ पोलिसांनी चोरीच्या संशयावरून या मुलीला बालसुधारगृहात दाखल केले होते. २१ जानेवारी रोजी वैद्यकीय तपासणीत ही मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. समितीच्या अधीक्षक व सदस्यांनी विश्वासात घेऊन मुलीला बोलते केले असता तिने साधारण पाच महिन्यांपूर्वी चाळीसगाव शहरात फुगे विकण्यासाठी आईसोबत आली होती. रात्री एका धार्मिक स्थळाजवळ आईजवळ झोपलेली असताना मध्यरात्री मोठी दाढी वाढलेली व गुडघ्यापर्यंत सदरा घातलेले दोन जण आले व झोपेतून उठवले. तू आमच्यासोबत आली नाहीस तर तुझ्या आईला चाकूने ठार मारू, अशी धमकी देऊन लांब अंतरावर घेऊन गेले. त्यातील एकाने डोक्याच्या बाजूने बसून हात धरून तोंड दाबले व दुसऱ्याने अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या आईला ठार मारू, अशी धमकी देऊन ते निघून गेले. भीतीपोटी मुलीने हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. अशातच जिल्हा पेठ पोलिसांनी चोरीच्या संशयावरून या मुलीला बालसुधारगृहात दाखल केले.

संशयिताचे रेखाचित्र बनविणार

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला व तसे पत्र चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. २२ जानेवारी रोजी पीडितेच्या जबाबावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चाळीसगाव पोलिसांनी पीडितेला घटनास्थळी नेऊन पंचनामा केला तसेच वर्णनावरून रेखाचित्र तयार केले जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक निसार सय्यद या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

कायदेशीर गभर्पात करणार

पीडिता अल्पवयीन व अविवाहित असल्याने तिचा गर्भपात केला जाणार आहे. त्यासाठी बालकल्याण समिती उच्च न्यायालयात जाणार आहे. तेथील आदेशानुसार सरकारी रुग्णालयातून कायदेशीर गर्भपात केला जाईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: The two committed atrocities while sleeping near the mother